आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांच्या हस्ते केक कापण्यात आला
कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांना अन्नदान करण्यात आले. आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील आमदार अशोक पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण,वृध्द, महिला व बालकांना अन्नदान करत आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी वढू बुद्रुक माहेर मधील २०० व सणसवाडी येथील मदत केंद्रातील १०० अशा एकूण ३०० माहेर मधील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांना अन्नदान करण्यात आले.यावेळी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने स्वतः जेवण वाढले तसेच माहेर मधील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांशी संवाद साधला.
आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांच्या हस्ते केक कापण्यात आला तसेच त्यांना गिड खाऊ देण्यात आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माहेर संस्थेच्या डायरेक्टर लुसी कुरियन, माहेर संस्थेचे इन्चार्ज विजय सवरणे, माजी चेअरमन सुहास दरेकर, उद्योजक प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, निलेश दरेकर, विठ्ठल दरेकर, बाळकृष्ण दरेकर, प्रा.अनिल गोटे, सुखदेव दरेकर पंढरीनाथ गोरडे, जालिंदर कासार , अशोक करडे, नवनाथ दरेकर, बंडू भोसले, संतोष शेळके, सुनिल हरगुडे मान्यवर उपस्थित होते.