पारंपरिक गाणी, उखाणे, फेर, फुगडी पिंगा, झोके, फुगडयांमध्ये महिला भगिनिनिंचा उत्स्फूर्त सहभाग
शिक्रापूर – राऊतवाडी (ता.शिरूर) येथे नागपंचमी निमित्त सासर व माहेरवासिनी यांचे विद्यमाने ” माहेरची नागपंचमी” असा एक आगळावेगळा सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी अनेक सासुरवाशीण व माहेरवाशिनिंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी राऊतवाडीतील सर्व माहेरवाशी लेकींना आग्रहाने निमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित सर्व महिलांनी या कार्यक्रमात पारंपरिक गाणी, उखाणे, फेर, फुगडी पिंगा, झोके, फुगडी अशा बऱ्याच खेळात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
बहुतेक सर्व माहेरवाशिनी बऱ्याच वर्षांनी सणासाठी आपल्या माहेरी आल्यामुळे त्यांना त्यांचे बालपणीच्या काळातील माहेरच्या आठवणी जागृत झाल्या. त्यांनी आपल्या स्वतःच्या मनोगतातून त्या व्यक्तही केल्या.या सोहळ्यामध्ये लहानां पासून ते अगदी वय वर्ष ८० पर्यन्त असलेल्या सर्व सासर व माहेरवाशिणी यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सदर उपक्रमा साठी मंगल भिमराव आटकर/म्हैत्रे, कविता राजेश बनकर/राऊत, कावेरी भारत टिळेकर/राऊत, उषा तानाजी राऊत/बालवडे, पूनम निलेश जगताप/करपे, रोहिणी कोल्हे, दीपा गणेश राऊत, उज्वला निलेश राऊत या महिलांनी विशेष योगदान दिले. श्रीकांत म्हेत्रे, एकनाथ करपे, रमेश करपे, गोपीचंद राऊत, स्वप्निल राऊत, तानाजी राऊत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुमूल्य सहकार्य केले.सोहळ्यासाठी राऊतवाडीतील एकूण साडेतीनशे सासर व माहेरवाशीनी महिला उपस्थित झाल्या होत्या. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.