मैत्री दिन व माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या वाढदिवसानिमित्त सासवडे परिवार व पै. मंगलदास बांदल मित्र परिवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक ऐक्य वाढविण्यासाठी मोलाची मदत
शिक्रापूर – पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सासवडे परिवार व पै. मंगलदास बांदल मित्र परिवार ह्यांच्या वतीने मलंगशाह दर्गा शिक्रापूर सुधारणा करण्यासाठी तीस हजार बांधकाम वीट( रक्कम दोन लाख रुपये) दर्गा कमिटी कडे सुपूर्द करण्यात येऊन शिक्रापूर येथे सामाजिक बांधिलकी जपण्यासह धार्मिक ऐक्य साधण्यात आले आहे.
या देणगी मुळे दर्गा कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले असून दर्ग्याच्या बांध कामासाठी यांचा मोठा लाभ होणार असून या तीस हजार विटांनी दर्ग्याचे बांधकाम मजबूत होणार तर आहेच पण याहीपेक्षा सामाजिक व धार्मिक एकता अबाधित राहत सामाजिक सलोखा व ऐक्य वृध्दींगत होणार आहे.
यावेळी माजी आदर्श सरपंच रामभाऊ सासवडे, सरपंच रमेश गडदे,राजेंद्र मांढरे , ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे,कृष्णा सासवडे, अनिल राऊत, तानाजी राऊत, जयेश विरोळे, शंकर वाबळे, दिलीप कोठावळे, विजय लोखंडे, अशोक शहाणे, अर्जुन राव शिर्के, प्रकाश चव्हाण, विठ्ठल सासवडे, दत्ता राऊत, गोरख कुंभार, अशोक तक्ते, मछिंद्र महाजन, बाळासाहेब शेळके, बापूसाहेब शिंदे, गणेश गायकवाड, अतुल सासवडे, मुन्ना तांबोळी, युन्नूस तांबोळी, मोहम्मद तांबोळी, आयुब तांबोळी, मुबारक तांबोळी, हारून इनामदार, अलीभाई तांबोळी, अमीर तांबोळी, बंटी तांबोळी, आदित्य सासवडे, महेश सासवडे, अजिंक्य सासवडे, तोफीक तांबोळी, बबलू शेख आदी ग्रामस्थ व दर्गा कमिटी चे सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.