पोलीस मदत केंद्र सुरू असूनही एकही कर्मचारी ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी नाही , नागरिकांना सहन करावा लागला मनःस्ताप
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) कर्णकर्कश हॉर्नचा आवाज ,दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यात एक रुग्णवाहिका अडकेलेली , हाकेच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले उदासीन पोलीस मदत केंद्र आणि त्यात बसलेले पोलीस कर्मचारी, रांगा लागलेल्या असतानाही मध्येच घुसनारू वाहने यामुळे वाहनांच्या रांगा वाढतच होत्या व वाहनचालक ,कर्मचारी, रुग्ण ,कामगार व प्रवासी यांना होणारा नाहक मनःस्ताप ..हा सगळा सावळा गोंधळ होता कोरेगाव भिमा येथील वढू बुद्रुक चौकात कोरेगाव भीमा येथील ट्रॅफिक जाम समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हाकेच्या अंतरावर मुख्य चौकात पोलीस मदत केंद्र असूनही एकही पोलीस अथवा ट्रॅफिक कर्मचारी नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा रांगाच रांगा लागल्या होत्या, कामगार ,नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास व मनःस्ताप सहन करावा लागला. यावेळी शाळा सुटलेल्या असताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता.
कोरेगाव भीमा येथील आठवडी बाजार आतमध्ये स्थलांतरित करूनही ट्रॅफिक समस्या संपण्याचे नाव मात्र नाही.यामुळे कंपनी कामगार , प्रवासी व रुग्ण यांना मोठ्या प्रमाणावर मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या ट्रॅफिक मध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती यावेळी पोलीस मदत केंद्रात काही कर्मचारी असूनही एकही कर्मचारी मदतीसाठी बाहेर न आल्याने रुग्णांच्या जीवाशी ट्रॅफिक जॅममुळे खेळण्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. कोरेगाव भीमा येथील बाजारामुळे ट्रॅफिक जाम होते अशी ओरड करण्यात येत होती त्यात तथ्यही होते पण सध्या पुणे महामार्गाचे मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण करण्यात आल्याने. वाहनांच्या तीन रांगा एका वेळी सुरू असतात त्यामुळे वाहतूक जलद गतीने होते.वाहने थांबत नाही.
कोरेगाव भिमा येथील वढू बुद्रुक चौक येथे वढू बुद्रुक कडून येणाऱ्या व कोरेगाव भीमा येथून वढूकडे जाणाऱ्या गाड्या अचानक मध्ये घुसत होत्या.बत्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाढत होती. रस्ता ओलांडताना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वढू चौकट एक अथवा दोन वाहतूक कर्मचाऱ्याची नित्तात आवशक्यता असते पण तेथे कर्जचारी उपलब्ध नव्हता . तसेच वढू बुद्रुक चौकात मुख्य हायवेलगत पोलीस मदत केंद्र असूनही ट्रॅफिक जॅम होते त्यात भर म्हणजे पोलीस मदत केंद्र सुरु होते आणि त्यामध्ये कर्मचारी असूनही एकही ट्रॅफिक सोडवण्यासाठी आले नाही.यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. कोरेगाव भीमा ते ढेरंगे वस्ती , सुयश मंगल कार्यालय इथपर्यंत ट्रॅफिक जॅम झाल्याचे दिसत होते.