माहेरहून सहा लाख रुपये आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
कोरेगाव भीमा – लोणीकंद ( ता.हवेली)
माहेरहून सहा लाख रुपये आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणीकंद भागात घडली. सासरी होणार्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.Tired of being harassed at Bhavadi, the married woman committed suicide by hanging herself
The incident of a woman hanging herself after being harassed by her husband who demanded to bring six lakh rupees from Maher took place in Lonikand area. Fed up with the physical and mental torture of her in-laws, the married woman committed suicide by hanging herself (Suicide In Pune). (A married woman committed suicide by hanging herself after getting tired of harassment at Bhavadi) (Pune Crime News)
गिता जाधव (वय ३४, रा. भावडी, लोणीकंद) असे आत्महत्या ( Suicide )केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी पती रमेश जाधव, सासरे प्रभाकर जाधव, सासु कमाबाई जाधव, दीर गणेश जाधव, सुरेश जाधव, जाऊ काशीबाई जाधव, मनिषा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ( pune Crime News)
याबाबत भगवान व्यंकटराव मेढे (वय ३९, रा. माजलगाव, जि. बीड) यांनी लोणीकंद पोलिसांकडे (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५७४/२३) दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण गीता जाधव हिचा रमेश जाधव याच्याशी विवाह झाला होता.लग्न झाल्यापासून माहेरहून दुचाकी घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये़ प्लॉट खरेदीसाठी ५ लाख रुपये का घेऊन येत नाही असे म्हणून तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती.
उपाशी ठेवून शारीरीक व मानसिक छळ केला जात होता.गेल्या १५ वर्षापासून हा त्रास गीता जाधव सहन करीत होत्या.
तरीही छळ कमी न झाल्याने शेवटी त्यांनी १२ जुलै रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु तपास करीत आहेत.(Pune Crime News)