कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) परिसरातील पि एम किसान योजनेसाठी लागणारी आवश्यक केवायसी व आधार सीडिंग करण्यासाठी शेतकरीच उदासीन असल्याचे दिसून येत असून संबधित शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी अधिकारी प्रयत्न करत असून यासाठी ठीठीकानी नोटीस बोर्डवर नोटीस,जनजागृती व मीटिंग घेत असूनही शेतकरीच उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.
यामुळे ३९८ ईकेवायसी व ५३७ आधार सिंडींग न करणारे शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी तातडीने आपले फॉर्म, संबधित कागदपत्रे, ऑनलाईन प्रोसेस करण्याचे आवाहन कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी केले आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजनेतील सर्व त्रुटी यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येतअसून केवायसी व आधार सीडिंग पूर्ण न केल्यास पुढील येणारे हप्ते वर्ग होणार नाहीत.
केवायसी व आधार सीडिंग केल्याने शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी सन्मान योजनेतील सहा हजार रुपये सुद्धा या माहितीच्या आधारे देण्यात येणार आहे त्यामुळे केवायसी व आधार सीडिंग लवकरात लवकर कराव असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत ग्रामपंचायत नोटीस बोर्ड, सी एस सी सेंटर ,समाज माध्यमे ,भेटीअंती मीटिंग घेऊन व्यापक प्रसिद्धी दिलेली आहे. शेतकऱ्यांना फ़क्त स्वतः जाऊन पोस्ट ऑफिस किंवा नजीकच्या csc सेंटर पर्यंत जाऊन आपली ekyc व आधार सीडिंग पूर्ण करायचे आहे. याबाबत कृषि विभागाकडून आव्हान करण्यात येत असून कॊरेगाव भिमा, डिंग्रजवाडी,धानोरे, वढू बुदृक, वाडा पुनर्वसन , आपटी , वाजेवाडी गावातील ३९८ ईकेवायसी व ५३७ आधार सिंडींग न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने ekyc पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोरेगाव भीमा पंच क्रोशितील बऱ्याच जागरूक शेतकऱ्यांनी आपले ई केवायसी व आधार सिडिंग तातडीने पूर्ण करून आपल्या योजनेचा लाभ घेत असतात यामुळे या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो पण काही शेतकरी आज करू उद्या करू असे करत इकेवायसी व आधार सिडिंग करत नसल्याचे दिसून येत असून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे
काय आहे पि एम किसान योजना –
केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे अनुदानित, पीएम किसान योजना १ डिसेंबर २०१८ रोजी कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष ६,००० रुपयांचे उत्पन्न समर्थन प्रदान केले जाते. एका कुटुंबाला एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च दरम्यान २,००० रुपयांचे तीन समान हप्ते मिळतात.
पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. पीएम किसान योजनेंतर्गत कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांची अल्पवयीन मुले असतात. पीएम किसान योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील शेतकरी उदासीन असल्याने ३९८ ईकेवायसी व ५३७ आधार सिंडींग न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेला मुकावे लागते कि काय अशी शक्यता वाटत वर्तवण्यात येत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.