Thursday, November 21, 2024
Homeक्राइमशेतमजुर महिलेला दांडक्याने मारहाण करत दागिने लुटणाऱ्या चोराला शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या...

शेतमजुर महिलेला दांडक्याने मारहाण करत दागिने लुटणाऱ्या चोराला शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोणावळा येथे वेषांतर करत नाव बदलून राहणाऱ्या निखील विजय पलांडे याच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करत ३ जबरी चोरी, ३ घरफोडी, १ वाहनचोरी व १ चोरीचा गुन्हा उघडकीस आणले असून एकुण ६२ ग्रॅम (६.२ तोळे वजनाचे सोन्यांच्या दागीन्यासह एक इको कार असा एकुण ९,२८,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त.

कोरेगाव भीमा – तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) येथील लांडेवस्ती या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतमजुर महिलेचे फेब्रुवारी महिन्यात सुनिता नवनाथ माने (वय ३३ वर्षे), रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे या त्यांचे शेतातील मक्याचे पिकाची खुरपणी करीत असताना चोरटयाने सुनिता माने यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचे गळयातील दिड तोळा वजानाचे मनीमंगळसुत्र व कानातील कर्णफुले बळजबरीने चोरून नेले होते.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी गुन्हयाचा तांत्रीक गुप्त बातमीदार, सी.सी.टी. व्ही. फुटेज व रेकॉर्डवरील आरोपी इ. पध्दतीने केला असता सदरचा गुन्हा हा यापुर्वीचा रेकॉर्डवरील आरोपी निखील विजय पलांडे, (रा.मुखई, ता. शिरूर, जि.पुणे) केला असल्याचा संशय पोलीसांना आला. त्याअनुषंगाने तपास केला असता सदर आरोपी निखील विजय पलांडे हा वेषांतर करून व नाव बदलुन लोणावळा येथे राहत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली.

गुन्हे शोध पथकाने आरोपी निखील पलांडे यास लोणावळा येथील महेंद्र रिसॉर्ट येथून ताब्यात घेतले. आरोपीने ६ महीन्याच्या कालावधीमध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मालमत्तेचे ८ गुन्ह्यांची उकल करण्यात शिक्रापूर पोलिसांना व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे. यामध्ये ३ जबरी चोरी, ३ घरफोडी, १ वाहनचोरी व १ चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेकडुन एकुण ६२ ग्रॅम (६.२ तोळे) वजनाचे सोन्यांच्या दागीन्यासह एक इको कार असा एकुण ९,२८,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर , सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांच्यासह सहाय्यक फौज.जितेंद्र पानसरे, पो. हवा.श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पो.ना.विकास पाटील, रोहीदास पारखे, संतोष मारकड, शिवाजी चितारे, अमोल नलगे, पो.कॉ. निखील रावडे व किशोर शिवणकर यांचे पथकाने केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांचे मार्गदशनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक रणजित पठारे व पोलीस नाईक अमोल नलगे हे करीत आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा उत्कृष्ट करं करत असून किचकट व आव्हानात्मक गुन्ह्यांची उकल अत्यंत अचूक दिशेने, सखोल व तांत्रिक विश्लेषण याद्वारे करत असून नुकताच सणसवाडी येथील खुनातील गुन्हेगारांना बेड्या ठोकणे असो की शेतमजुर महिलेला मारहाण करत दागिने चोरणारा जेरबंद करणे असो यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध कार्यात उत्तम कार्य करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!