कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ट्रंटर इंडिया प्रा ली कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत ७५ फळ, फुले व इतर प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
शेतीप्रधान असणाऱ्या डिंग्रजवाडी गावामध्ये ट्रेंटर इंडिया प्रा.ली. कंपनीच्या माध्यमातून आंबा,चिकू, पेरू, बदाम , डाळिंब या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची गरज भासत असून ती काळाची गरज आहे यासाठी सर्व समाजाने पुढे यायला हवे. भविष्यात आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागेल असे होऊ नये यासाठी आपण आजच झाडे लावू टी जगवू त्यामुळे आपल्या पुढील पिढीला स्वच्छ वातरवण व आरोग्यवर्धक पर्यावरण राहील अन्यथा आपण झाडे तोडून आपलेच नुकसान करत आहोत अशा भावना व्यक्त करीत झाडे लावा झाडे जगवा व वसुंधरा वाचवा असा कृतियुक्त संदेश दिला आहे
यावेळी ट्रेंटर इंडिया कंपनीचे एचआर वेद प्रकाश तिवारी, संदीप खर्गे डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत गव्हाणे, माजी उपसरपंच बारीकराव गव्हाणे ,ग्राम पंचायत सदस्य प्रसाद गव्हाणे, अनिल गव्हाणे, प्रिया गव्हाणे, संगीता गव्हाणे , मल्हारी गव्हाणे , ग्रामसेवक जासूद साहेब उपस्थित होते.