Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक.... मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षांचा मुलगा जखमी

धक्कादायक…. मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षांचा मुलगा जखमी

आमदार अशोक पवार यांनी तातडीने उपचार उपलब्ध करून देत कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठवले पि ए ला

कोरेगाव भीमा – दिनांक २ जून
पिंपळसुटी ( ता.शिरूर) येथील साहील नाना म्हस्के ( वय १० वर्षे ) हा मोबाईलच्या स्फोटामुळे जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला इजा झाली असून आमदार अशोक पवार यांनी प्रसंगावधान दाखवून साहिलच्या उपचारासाठी तातडीने एच व्ही देसाई हडपसर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिल्याने कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

  पिंपळसुटी येथील सहील म्हस्के मोबाईल हाताळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला काही क्षण त्याला काही समजले नाही स्फोटाच्या आवाजाने कुटुंबीय धावत आले त्यावेळी सहीलाच्या डोळ्याला इजा झाली होती तसेच तो खूप घाबरला होता. त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता होती. कुटुंबीयांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांनी याबाबत आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांना संपर्क साधला असता आमदार अशोक पवार  यांनी मुलाची चौकशी करत काही काळजी करू नका , आपण त्याच्यावर उपचार करू घाबरु नका मी आहे असे आधाराचे शब्द देत तातडीने  सहाय्यक पि ए यांना कुटुंबियांच्या मदतीसाठी  पाठवले तसेच वेळोवेळी उपचार व मुलाच्या तब्येतीची विचारणा करत कुटुंबीयांना आधार दिला.

पालकांनी मुलांच्या हातात तासनतास मोबाईल देण्यापेक्षा इतर बाबतीत त्यांना मनोरंजन,वाचन,लेखन , संवाद करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मोबाईलच्या बॅटरी बाबत योग्य ती काळजी घ्यावी ज्यामुळे असे अपघात टळतील.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!