कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन ( ता.शिरूर) येथील सरपंच योगिता नितीन ढोरे यांनी एक अभिनव उपक्रम राबवला असून याची मोठी प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. ग्राम सभेला ग्रामस्थांची उपस्थिती हा चिंतेचा विषय बनत असून ग्राम विकासासाठी ग्रामस्थांचा व्यापक सहभाग असायला हवं व विकासकामांवर सर्वांगीण चर्चा व्हावी , नवनविन विकास कामे व जनहिताच्या अभिनव कल्पना सर्वांनी मांडत गावचा विकास कसा असावा व त्यात प्रत्येकाचा सक्रिय सहभाग यासाठी अनोखा उपक्रम राबवला असून यामध्ये एका ग्रामस्थाची लकी ड्रॉ माध्यमातून चालू वर्षाची घरपट्टी भरणायात येणार असल्याने समजा माध्यमावर सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्या विकासाप्रती असणाऱ्या जाणिवेची व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभाग वाढवण्याच्या कल्पकतेचे कौतुक हित असून सरपंच असावा तर असा अशी शाबासकी मिळत आहे.
सदर ग्रामसभा १८ मे रोजी सकाळी ११वाजता ग्राम पंचायत कार्यालय वाडा पुनर्वसन येथे होणार आहे. यावेळी नवनिर्वाचित सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्या लकी ड्रॉ निवडीच्या माध्यमातून एका ग्रामस्थाच्या घराची चालू वर्षाची घरपट्टी भरण्यात येणार असल्याने ग्रामस्थही या ग्रामसभेस उत्सुक आहेत.
वाडा पुनर्वसन ( ता.शिरूर) हे चास कमान धरणाखाली जमिनी गेलेल्या पुनर्वसितांच उपेक्षित व दुर्लक्षित गाव असून येथील ग्राम पंचायतीला अल्प उत्पन्न आहे. ना उद्योग व्यवसायांचे उत्पन्न की, ना मोठ्या प्रमाणावर घर व पाणी पट्टीचे उत्पन्न अल्पशा उत्पन्नावर गावचा कारभार पाहायचा.
येथील तरुण व वयोवृध्द ग्रामस्थांच्या मनावर आजही धरणाखाली गेलेल्या गावच्या आठवणी आहेत.दरवर्षी पावसाने धरण भरते तसे त्यांच्या काळजाला चटके देणाऱ्या व आयुष्याची दैना करणाऱ्या घटना उलगडत जातात नांदती कुटुंबे उद्ध्वस्त होताना काळजाचा थरकाप उडतो आणि भरलेल्या डोळ्यांनी मरणयातना भोगत निर्जीव व निरुस्ताही जगण्याच्या संघर्षाला तोंड देत उभे राहत नवीन प्रदेशात नियतीशी, सरकारशी, मुर्दाड प्रशासन व्यवस्थेशी दोन हात करत पुन्हा एकदा आयुष्याच्या मशाली पेटवत मांडावा लागतो कुटुंबासह जगण्याचा संघर्ष मांडणारे गाव म्हणजे वाडा पुनर्वसन