कोरेगाव. भीमा – दिनांक २मे
वाडा पुनर्वसन येथील ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी योगिता नितीन ढोरे यांची निवड झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाडा पुनर्वसन ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त झाल्याने दिंनाक २ मे रोजी झालेल्या निवडणुकीत योगिता नितीन ढोरे व वैष्णवी राजेश हत्ते या दोन उमेदवारांचा अर्ज दाखल झाला. ३/२ अशा फरकाने योगिता नितीन ढोरे यांची निवड झाल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी एम बी ढाके यांनी निवड झाल्याचे जाहीर केले.निवडणूक कामकाजात ग्रामसेवक विमल आव्हाड यांनी सहकार्य केले.
यावेळी माजी सरपंच वसंत भोकटे, नवनाथ माळी, सुरेश माळी, उपसरपंच स्वाती माळी, माजी उपसरपंच सुरेखा ढोरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन ढोरे, गणेश मंडळाचे अध्यक्ष मोहन माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत माळी, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष संपत माळी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढोरे, सुधीर ढोरे व सूर्यकांत गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाडा पुनर्वसन गावामधील उर्वरित सर्व विकास कामे मार्गी लावण्यासह महिलांचे सक्षमीकरण व शिक्षणाच्या आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी कायम तत्पर राहणार आहे. – नवनिर्वाचित सरपंच योगिता नितीन ढोरे