कोरेगांव भीमा येथे भव्य श्रीराम कथेचे आयोजन ज्ञानयज्ञाला गावातील १०८ कुटुंबांनी घेतला सहभाग
कोरेगांव भीमा – कोरेगांव भीमा ( ता.शिरूर). येथे श्री राम कथा कार्यक्रम प्रसंगी प्रभू श्रीराम म्हणजे सदाचार ,एक वचनी एक पत्नी व आज्ञाधारक पुत्र व प्रजाहितदक्ष राजा यांचे सत्ययुग होते असे मार्गदर्शन केले. आपल्या जीवनातील राम जाणे म्हणजे जीवनात तथ्य आणि अर्थ न उरणे त्यामुळे आपले वचन वाया जाऊ देऊ नका आणि कामातील राम जाऊ देऊ नका असे मार्गदर्शन रामायणाचार्य वैष्णवी दीदी यांनी केले.
कोरेगाव भीमा ( ताल.शिरूर) येथे श्री राम नवमी जन्मोत्सव निमित्त भव्य श्रीराम कथा - ज्ञानयज्ञ यांचेभव्य असे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम नवमी निमित्त करण्यात आलेल्या ज्ञानयज्ञाला गावातील १०८ कुटुंबांनी सहभाग घेतला होता.यावेळी पुरोहित म्हणून अर्जुन पंडित उज्जैन, श्रीनिवास काका कर्डेकर, शशांक चिक्षे यांनी केले.
यावेळी श्रीराम चरित्र ग्रंथाची ग्रामस्थांच्या वतीने सवाद्य भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.श्रीराम कथा रामायणाचार्य ह. भ. प. साध्वी वैष्णवी सरस्वती या कथा सांगणार आहे त्यांना गायनाचार्य भर्तरीनाथ विधाते, तबलावादक निखिल ताकभाते, ढोलक वादक गणेश विधाते,सिंध वादक मयूर , झाकी अविनाश देशमुख महाराज हे संगीत सेवा करणार आहेत.
कोणत्याही प्रकारची राजकीय व प्रसिध्दी यापासून दूर असलेल्या ग्रामस्थांच्या एकत्रित येण्याने हा सोहळा अभूतपूर्व ठरत असून भाविक भक्ताच्या मनाला भावत आहे.दिनांक ३० मार्च ते ६ एप्रिल पर्यंत ग्रंथ महोत्सव – संत चरित्र, शिवपार्वती विवाह, श्रीराम जन्मोत्सव, सीता स्वयंवर,श्रीराम वनवास, श्रीराम भरत मिलाप,रामेश्वर पूजन, श्रीराम राज्याभिषेक, काल्याचे कीर्तन यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.६ एप्रिलला सूर्यनमस्कार व जोर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सुशोभित भव्य मंडप व्यवस्था, ध्वनी ( साऊंड) व्यवस्था, महिला व पुरुष यांच्यासाठी छान बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. समस्त ग्रामस्थ कोरेगांव भीमा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे.