कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील श्री छञपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये २००२ च्या १० वीच्या बॅचने तीच शाळा, तोच फळा , …. तेच शिक्षक .. २९ वर्षांनी भरला विद्यार्थी – विद्यार्थींनींचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींना पाहून शिक्षकांना मोठा आनंद झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सन २००२ च्या १० वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी शाळा व नव्या विद्यार्थ्यांसाठी विधायक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी शिक्षक मिरा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहमेळाव्याला प्रमुख पाहुणे संत व समाजसुधाकर केंद्र चे समाजसेवक उत्तमराव भोंडवे, वर्षा वाजे मॅडम, सूर्यवंशी सर उपस्थित होते.
यावेळी शिक्षीका सूर्यवंशी मॅडम यांनी आदर्श विद्यार्थी घडविणे शाळेचे कर्तव्य आहे आम्ही घडविलेले विद्यार्थी मोठे झालेले पाहणे यातच मोठे समाधान आहे.
कार्यक्रमप्रसंगी सर्वांना फेटे बांधण्यात आले होते.तसेच स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते.यावेळी माजी विद्यार्थी स्वप्नील भोंडवे, बापुसाहेब भोसुरे, रंजना लोंढे, अर्चना परदेशी, ज्योती दौडकर सचिन घावटे, जुल्कार पठाण, यांनीही मनोगते व्यक्त केली. गोरक्ष घावटे, विनायक गव्हाणे, अक्षय हगवणे, गणेश भवाळकर काशिनाथ शिंगी यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले .अंकुश घटमाळ यांनी सुत्रसंचालन तर सचिन घावटे यांनी आभार मानले.