केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला धक्का देत, शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol Crisis) हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे.यावरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होताना दिसत असून याबाबत खासदार संजय राऊत यांनी ट्विटर द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटिसहित काही ओळी देत मोठा खळबळ जनक मत मांडले आहे.यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच, हा प्राथमिक आकडा असून शंभर टक्के सत्य असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळी लिहिलेल्या आहेत. “ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” त्यासोबतच संजय राऊत यांनी कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यभरातील शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, ठाकरे गटाचे अनेक नेतेही केंद्रीय निवडणूक आयोगासह शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र डागत आहेत.
अशातच संजय राऊतांनी ट्वीट करत निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.