पिंपरी चिंचवड –
संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी संत तुकाराम महाराज हे निर्भीड संत व विद्रोही कवी होते. संत तुकाराम महाराज यांचे क्रांतीकारी विचार आजही खूप प्रभावी आणि प्रखर वाटतात,संत परंपरेमधील एक प्रखर विज्ञानवादी विचार मांडणारे कवी म्हणून संत तुकाराम महाराज ओळखले जातात.तत्कालीन जातिव्यवस्था,अंधश्रद्धा यावरती संत तुकाराम महाराजांनी जोरदार प्रहार केला आहे. त्यांचे अभंग आज ही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. जगातली पहिली कर्जमाफी करणारे हे संत तुकाराम महाराज होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणा देणारे ही संत तुकाराम महाराज होते संत तुकाराम महाराज यांचे कार्य खूप महान आहे त्यांचे महान कार्य जनतेसमोर पोहचले पाहिजे तसेच त्यांची शिकवण ही मानवतेवर आणि समतेवर आधारित आहे परंतु आज कालचे तथाकथित स्वयंघोषित काही महाराज हे तुकाराम महाराज आणि त्यांची पत्नी जिजाबाई यांच्या बद्दल चुकीची मांडणी करून त्यांचा अवमान करत आहेत. अशी खंत प्रकाश जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, नगरसेवक सचिन चिखले,छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या समुह शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष संजय जाधव, सचिव मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष नकुल भोईर, सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार, छावा संघटनेचे शहर अध्यक्ष संतोष वाघे,उपाध्यक्ष गणेश भांडवलकर, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष वाल्मिक माने, उपाध्यक्ष अशोक सातपुते, अभिषेक म्हसे, सागर तापकीर,सोनाली म्हस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी केले होते.