Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याश्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू नये - आमदार...

श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू नये – आमदार अशोक पवार

कोरेगाव भीमा – दिनांक २२ डिसेंबर

शिरूर – हवेली मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांनी विधासभेत श्री छत्रपती संभाजी महाराज हे तुमचे आमचे दैवत आहे .स्मारकासाठी २७० कोटी रुपये प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्याला एकही रुपया कमी पडू देऊ नका उलट याला ४७० कोटी रुपये केले तरी लोक तुम्हाला दुवा देतील कधी काळी इकडची बाजू तिकडे असते तिकडची बाजू हीकडे असते परंतु काही विषय केले पाहिजे. जो काही निधि दिला होता, मागच्या व्हाईट बुकमध्ये निधी मंजूर केला त्याला स्टे दिला होता त्याविषयी फडणवीस साहेब आपल्याला विनंती आहे की तो स्टे उठवावा …

विधानसभेत श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक विकास निधीबाबत बोलताना आमदार अशोक पवार

याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतीत स्टे नाही असे उत्तर दिले. तरतूद केली नाही तरतूद करावी याबाबतीत शब्द द्यावा याला उपमुख्यमंत्री यांनी तातडीने प्रत्युत्तर देत तरतूद करावी याला २९० कोटींचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला हा शब्द बसून दिला असला तरी हे रेकॉर्डला येणार असे म्हणत आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आपण दिलेला शब्द फसवा नसून आपण तो पूर्ण करणार असा विश्वास व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण संवादाने सभागृहात छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी राज्यसरकार सकारात्मक आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.शंभू भक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला स्मारकाचा प्रश्न विधानसभेत मांडत त्याबाबत निधीची कमतरता पडणारा नाही तसेच सत्ता येते जाते पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही भूमिका आमदार अशोक पवार यांनी मांडली त्याला सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने सर्व शंभू भक्तांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार अशोक पवार यांचे सभागृहातील संभाषण सोशल मोडियायावर प्रसारित करत आनंद व्यक्त केला.

सरकार बदलत राहतील पण महाराष्ट्राच्या इतिहासातील व जनमानसांच्या मनातील अढळ स्थान असलेल्या छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे विकास काम तातडीने सुरू व्हायला पाहिजे. यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, दर्जेदार व जगाची नेत्रे दिपवणारा विकास होईल इथल्या मातीत त्यांच्या त्यागाचा व बलिदानाचा अंश आहे त्या मातीसाठी राज्यसरकार नेत्रदीपक विकास करेल अशी अपेक्षा शंभू भक्त व्यक्त करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!