प्रतिनिधी मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शालेय स्तरावर अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अपूर्व विज्ञान मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकूण १०९ प्रकल्पांचे सादरीकरण केले. या विज्ञान मेळाव्यात ५७२ विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे निरीक्षण केले या प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश होता. वैज्ञानिक रांगोळी, विज्ञान प्रश्नमंजुषा, हायड्रोलिक मिसाईल, रूम हीटर ,तुषार सिंचन ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर हवेचा दाब बल उष्णता पवन ऊर्जा घनता पर्यावरणातील बदल अशा विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मयुर भुजबळ व विद्यार्थांचे पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांची माहिती व नाविन्यपूर्ण कल्पना याविषयी माहिती देण्यात आली. प्रदर्शनास कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय नंबर एक व दोन येथील विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रकल्पातील सहभागी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी कौतुक केले.प्रयोगासाठी विद्यालयातील शिक्षक किरण झुरंगे , मिलिंद गायकवाड, आदेश गारगोटे , गणेश मांढरे, गणेश मुंजावडे, शालन खेडकर,मेघा गावडे यांनी प्रोत्साहन दिले .
अपूर्व विज्ञान गणित मेळाव्याचे आयोजन विज्ञान विभाग प्रमुख सुरेखा डोईफोडे, मीनाक्षी चेडे व अर्चना जरांगे यांनी केले होते . माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, व पुणे जिल्हा गणित विज्ञान अध्यापक संघ आयोजित पुणे टॅलेंट सर्च(PTS)च्या वतीने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त इयत्ता दहावी गणित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .