Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याएम फिल्टर कंपनीला भीषण आग

एम फिल्टर कंपनीला भीषण आग

आगीमध्ये कंपनीचे दोन कामगार जखमी तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान

कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील एम फिल्टर या मास्कचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग लागली असून आगीच्या ज्वाळांचे व काळ्या धुराचे लोटच लोट आकाशात जात होते. आगीच्या काळ्या धुराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीमध्ये तीन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.आगीच्या व धुराच्या प्रचंड लोट आकाशात झेपावले दिसत असल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.


कंपनीत उत्पादित माल हा ज्वलनशील असल्यामुळे आगीचे प्रमाण इतके भयाण होते की संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून या उत्पादनासाठी आवश्यक असणारा गॅसच्या टाक्या आगीच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणात स्फोट होऊन परिसरात भितीचे वातावरण निरमन झाले तसेच स्फोट झाल्याने अग्निशमन दलालां आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते .यासाठी पुणे महानगर प्राधिककरण्याची वाघोली येथील अग्निशामक दल, आळंदी नगरपरिषद व रांजणगाव औद्योगिक त्याचप्रमाणे आजूबाजूला असणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या सुरक्षा साधनांची मदत केली परंतु आगीची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग विझवण्यासाठी अत्यावश्यक असणारा पाण्याचा पुरवठा कमी पडल्याने व पंचक्रोशीत खाजगी पाणी पुरवठा दरांकडे पाण्याच्या टँकरची मागणी करत पुरवठा करन्यासाठी पाचारण करण्यात आले परंतु घटना स्थळी रस्त्याचे सुरू असणारे काम व बघ्यांची गर्दी मोठ्यावप्रमानात आसल्याने मदत कार्यामध्ये अडथळा निर्माण होत होता.

एम फिल्टर कारखान्याला आग लागल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मोलाचे कार्य केले असून मोठ्या प्रमाणत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधत अग्निशमन दल , पाण्याच्या गाड्या व वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण यांच्याशी संपर्क साधत तातडीने मदत करू करण्याचे काम केल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे कार्य अनमोल मानले जात आहे.


कारखान्याला लागलेल्या आगीची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने कारखान्याच्या आतमध्ये जाण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे कारखाना परिसरात आगविरोधी आवश्यक साहित्य व उपकरणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने आग आटोक्यात येत नव्हती, पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला व कंपनीला आग लागल्याने तातडीने वीज पुरवठा बंद केल्याने स्थानिक शेतकर्यांचा विहिरीतून पाणी घेन्यासाठी अडथळा निर्माण होत होता .
यावेळी अग्निशमन दल , तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन,नरेश्वर वॉटर सप्लायर यांनी मोलाचे कार्य केले.


सदर घटनेची माहिती मिळताच यावेळी उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहा. पोलीस निरीक्षक राम पठारे, राकेश मळेकर, पोलीस नाईक पारखे, अशोक केदार,सहाय्यक फौजदार तेजस गायकवाड, सहाय्यक फौजदार अशोक शिंदे, स.पो.हवालदार सचिन चव्हाण तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे काशिनाथ गरुड , सुजाता कापरे, संदीप कारंडे,हेमंत कुंजीर ,महेंद्र पाटील ,काळुराम राम दाभाडे, प्रकाश माने यांनी मोलाचे करू केले.पोलीस पाटील जयसिंग भंडारे, तलाठी शारदा शिरसाठ, कोतवाल भाऊदास भालेराव, कृष्णा (पप्पू)आरगडे,अग्निशमन दल आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!