Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रकेंदूरचे सरपंचपदी सुर्यकांत थिटे तर उपसरपंचपदी विठ्ठल ताथवडे यांची निवड

केंदूरचे सरपंचपदी सुर्यकांत थिटे तर उपसरपंचपदी विठ्ठल ताथवडे यांची निवड

केंदूर (ता.शिरूर) येथील सरपंदी सुर्यकांत रावसाहेब थिटे तर उपसरपंचपदी विठ्ठल प्रभाकर ताथवडे यांची निवड झाली. गावातील पाणी योजना, आरोग्यसेवा, रस्ते, जलसंधारण, शिक्षण आणि गावात नवीन प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेणारे व माजी खासदार दिवंगत बापूसाहेब थिटे यांच्या भावकीतील सुर्यकांत थिटे यांची निवड ही एकमताने झाली हे विशेष.

केंदूर ग्रामपंचयातीचे सरपंच-उपसरपंच अनुक्रमे अविनाश साकोरे व योगिता ज्ञानेश्वर थिटे यांच्या राजिनाम्यानंतर रिक्त जागेसाठी माजी सभापती सदाशिवराव थिटे, शाहुराज थिटे, सतीश थिटे, प्रमोद प-हाड आदींनी दोन्ही पदांच्या निवड प्रक्रीयेत सहभाग घेवून सर्व १७ सदस्यांचे एकमत घडवून आणले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रीयेत सरपंच-उपसरपंचपदासाठी अनुक्रमे सुर्यकांत थिटे व विठ्ठल ताथवडे यांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल दरेकर व तलाठी रमेश घोडे यांनी दोन्ही पदांसाठीची निवड जाहीर केली.

निवडींनंतर दोघांचे सन्मान वरील मान्यवरांसह माजी सभापती प्रकाश पवार, सुभाष उमाप, शंकर जांभळकर, शेखर पाचुंदकर आदींनी केले. दरम्यान गावातीला पाणी योजना, आरोग्यसेवा, रस्ते, जलसंधारण, शिक्षण आणि गावात नवीन प्रक्ल्प राबविण्यासाठी पुढाकार घेवून अनेक कामांना सुरूवात करुन दिल्याने त्यांच्या निवडीसाठी एकमुखाने सर्वांनी होकार दिल्याची माहिती माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे यांनी दिली. दरम्यान सत्कार समारंभाला माजी सरपंच तुकाराम थिटे, राजेंद्र ताठे, रामभाऊ थिटे, रामभाऊ साकोरे, अभिजित साकोरे, पोलिस पाटील सुभाष साकोरे व सर्व सदस्य उपस्थित होते. चौ

केंदूरचे पोपटराव पवार म्हणून पाहतोय आम्ही…!
गेल्या दोन वर्षात गावासाठी ६० कोटींची पाणी योजना, जलसंधारणासाठीचे ९ कोटी, लोकवर्गणीतून जलस्तर वाढविण्यासाठीची पाणीदार चळवळ, जलसंपदाची दिड कोटींची कामे व लोकहिताची अन्य १० कोटींची कामे करण्यात सुर्यकांत थिटे यांचा पुढाकार गावासाठी महत्वाच ठरलाय. त्यामुळेच त्यांना सरपंचपदासाठी आम्ही संधी देताना ते केंदूरचे पोपटराव पवार होण्याची आम्ही त्यांचेसोबत असल्याचे यावेळी माजी सभापती सदाशिवराव थिटे यांनी सांगितले.

प्रदीप कंद, देवदत्त निकम ते आयकर आयुक्तांच्या शुभेच्छा…!
गेली अनके वर्षे अथक ग्रामविकासासाठी अनेक क्षेत्रांत काम करुन राजकारणातही सक्रीय राहणारे सरपंच सुर्यकांत थिटे यांना त्यांच्या निवडीनंतर भाजपाचे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, सभापती देवदत्त निकम, कोल्हापूरचे आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर व जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी निवड झाल्यानंतरच्या पहिल्या तासातच फोन करुन शुभेच्छा दिल्याची माहिती श्री थिटे यांनी दिली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!