Friday, November 22, 2024
Homeन्यायमहिलाकांतीलाल बोथरा यांच्या जिव्हाळा एज्यूकेशन ट्रस्टतर्फे अष्टपैलू गुणवंत महिलांचा मंत्री केसरकरांच्या हस्ते...

कांतीलाल बोथरा यांच्या जिव्हाळा एज्यूकेशन ट्रस्टतर्फे अष्टपैलू गुणवंत महिलांचा मंत्री केसरकरांच्या हस्ते गौरव

माजी सभापती सुजाता पवार यांचा सन्मान करत त्यांच्या कार्याचा गौरव

शिरूर – दिनांक ३० नोव्हेंबर
शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू १२ गुणवंत महिलांचा सन्मान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते, शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करणेत आला. यावेळी या महिलांच्या कार्याचा अनोखा सन्मान जिव्हाळा एज्यूकेशन ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात येऊन महिलांच्या कर्तव्याला अनोखा सलाम करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील शिरूर घोडनदी येथील बांधकाम साहित्य व दिनेश स्टीलचे मालक कांतीलाल बोथरा, यांनी आपल्या मातोश्री श्रीमती मुळीबाई पन्नालाल बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी, तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स येथे जिव्हाळा एज्यूकेशन ट्रस्ट आयोजित विविध क्षेत्रातील “अष्टपैलू १२ गुणवंत महिलांचा सन्मान” करण्यात आला. हा यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शिरुरसह राज्यभरातील अनेक व्यापारी, व्यावसायिक व विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
हा सन्मान स्वीकारण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी व अहमदनगर जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, दौंडच्या चंद्रकला प्रेमसुख कटारिया, पुण्याच्या सुरेखा सतीश सुराणा व मनीषा कल्पेश दुगड, आळेफाटा येथील मंगल विनोद गांधी, शिरूर येथील पुष्पा नेमीचंद फुलफगर, उज्वला अभय बरमेच्या व मंगल कांतीलाल बोथरा या सन्मानार्थी उपस्थित होत्या.
तर काही कारणास्तव दिनाभाभी प्रकाश धारीवाल, राजस्थानच्या पुष्पा राजेंद्र गोखरू व दौंडच्या कांचन राहुल कुल उपस्थित राहू शकल्या नाहीत.

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, लोकमत समूहाचे मिलन दर्डा, सतीश सुराणा, संतोष बोथरा, कुंदन कांकरिया, कुणाल लुक्कड, शशिकांत साखला, भारती दुगड, अतुल कांतीलाल बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिव्हाळा एज्यूकेशन ट्रस्ट चे अतुल बोथरा, कुणाल लुंकड, चोथमल कोठारी, दिलीप कोठारी, अजित ओस्तवाल, स्वप्नील ओस्तवाल, शुभम बरमेचा, सारिका नवलाखा, राहुल बोथरा, शशिकांत सांकला आदींनी प्रयत्न केले.
तर शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व अनेक संघटनांनी यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रसंचालन रंजना बोरा व अलका कोलेकर यांनी केले
.

माजी सभापती सुजाता पवार यांचा सन्मान करताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व उपस्थित मान्यवर

आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व माजी सभापती सुजाता पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महापूर असो की,अतिवृष्टी असो , कोरोना सारख्या कठीण काळातही त्यांनी अनमोल व भरीव कार्य केले.आपल्या जिल्हा परिषदा सदस्य पदाच्या माध्यमातून विकासाचा आलेख उंचावत ठेवला ,सामान्य माणसांच्या सुख दुःखाशी असणारी बांधिलकी जपली त्याचाच गौरव म्हणून हा सन्मान देण्यात आल्याचा भावना नग्रियांनी व्यक्त केल्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!