तीन गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतूस व मोबाईल हैंडसेट असा एकूण २,०५,६००/- रुपये किंमतीचा माल जप्त.
हेमंत पाटील सातारा
सातारा – साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्हयामध्ये विनापरवाना तीन गावठी पिस्टल, तीन जिवंत राउंड व तीन मोबाईल हैंडसेट असा एकूण २,०५,६००/- रुपये किंमतीचा माल जप्त करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख हे अवैध धंद्याचे जाळे उधवस्त करत आहे. अवैध व्यावसायिकांनी त्यांचा धसका घेतला असून पोलीस अधीक्षक यांच्या धडक कार्यवाहीने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत दिनांक १२ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार अमित हणमंत कदम (रा. कुंभारवाडा अंतवडी ता.कराड जि.सातारा ) याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल असून तो अंतवडी फाटा ता.कराड जि.सातारा येथे उभा आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष तासगांवकर व त्यांच्या पथकास सदर गुन्हेगारास पकडून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कारवाई पथकाने अंतवडी फाटा ता.कराड जि.सातारा येथे जावून कौशल्याने अमित कदम यास पकडूनत्याची झडती घेतली असता, त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत राउंड व एकमोबाईल हॅन्डसेट असा एकुण ७५,६००/- रुपये किंमतीचा माल मिळुन आला.
सदर आरोपी अमित कदम याचेवर यापुर्वीही बेकायदेशिर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे नोंद असल्याने त्याच्याकडे कारवाई पथकाने सखोल तपास केला असता, त्याने आणखी दोन पिस्टल विक्री करता आणले असल्याचे सांगून ती दोनपिस्टल प्रसाद प्रकाश वाघ (रा. विद्यानगर कराड )व धीरज उर्फ कान्या बाळासाहेब भोसले रा. मसूर यांच्याकडे आहेत व ते दोघे उंब्रज रोडवरील हॉटेल सिध्दार्थ जवळ उभे आहेत असे सांगितले. मिळालेल्या माहितीप्रमाणे कारवाई पथकाने हॉटेल सिध्दार्थ उंब्रज रोड येथे जावून प्रसाद वाघ व धीरज उर्फ कान्याभोसले यांना ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातही प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्टल, व एक मोबाईल असा एकुण १,३०,०००/- रुपये किंमतीचा माल मिळुन आला.
सदर कारवाईमध्ये सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख,पोलीस बापू बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर,सहायायुक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, रमेश गर्जे, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, अमोल माने, स्वप्नील माने, स्वप्नील दौंड, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीबापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.