हेमंत पाटील सातारा
सातारा – दिनांक ५ ऑक्टोंबर
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २०१९ मध्ये तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन पहाटेचा शपथविधी करून ४८ तासांचे सरकार करण्याचा प्रयत्न केला ते करताना पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारले होते का? मग आपण केलेली ती बेईमानी नव्हती का? असा प्रतिसवाल राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना केला.
विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री देसाई कडाडले.ते पाटण येथील त्यांच्या दौलतनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. मंत्री देसाई यांनी एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते आहेत. ४० आमदार १२ खासदार १४ राज्यांचे राज्यप्रमुख, बहुतांशी जिल्हाप्रमुख शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत त्यांच्या भुमिकेला व उठवाला अजित पवार बेईमानी शब्द वापरतात, हे पूर्णपणे चुकीचे असून ते आम्ही कदापी ही सहन करणार नाही.
दरम्यान शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदूत्वाच्या विचारांपासून बाजूला नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केल्याचा आरोप करून शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव करून केलं आहे. मात्र अजित पवार जर आमच्या उठावाला बेईमानी शब्द वापरत असतील तर हे पूर्णपणे चुकीचे असून त्यांना शिंदे समर्थक जनता कदापी सहन करणार नाही. आपण सडेतोड आहात तर बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी असा सल्ला ही मंत्री देसाई यांनी अजित पवार यांना दिला.