तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी) येथील दुर्गा आळीच्या गडप्रेमी बालचमु हर्षवर्धन ढमढेरे आणि शिवांश ढमढेरे या दोघा भावांनी मिळून मल्हारगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दुर्गा आळीच्या दोघा भावांनी मल्हार गड किल्ल्याची प्रतिकृती करून सर्वांचे आकर्षण वाढवले आहे. या कामी पालक दिगंबर ढमढेरे आणि नितीन ढमढेरे यांनी मुलांना प्रोत्साहन मार्गदर्शन केले. हर्षवर्धनने गेल्या वर्षीच्या किल्ले बनवा स्पर्धेत शिरूर तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्याचे इतक्या लहान वयात गड प्रेम पाहून पालकांनी त्यांना अधिक असे प्रोत्साहन दिले. दिवाळीच्या सुट्टी लागल्यापासून किल्ल्यांना लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करून किल्ला बनवणे दरवर्षीचेच झाले आहे.
तळेगाव ढमढेरे या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे तीच परंपरा कायम ठेवत आपल्या अंतर्भूत कलेचे सादरीकरण करून समाजाला संदेश देत आहे आणि आपले गट प्रेम प्रदर्शन करत आहे या दोन्ही उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.