पुणे – दिनांक ११ सप्टेंबर
श्रीकृष्ण मंगल कार्यालय, एरंडवणेयेथे महाराष्ट्र जोशी समाज समिती महाराष्ट्र प्रदेश यांचा ३५ व्या वधू वर मेळावा व विद्यार्थी गौरव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्र राज्यभरातून. विविध समाज बांधव उपस्थित होते. यावेळी एन टी ए, बी , सी,डी प्रवर्गातील हक्कांविषयी जागृती करण्यात आली तसेच त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक न्याय हक्कांसाठी एकत्रित येत लढा देण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी मागास वर्गीय भटक्या विमुक्त सदस्य लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राची संस्कृती भटक्या समाजाने संस्कृती जगवली.
देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे , मुलांना जात पडताळणी प्रमाण पत्र, घरकुल उपलब्ध नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही, संस्कृतीचे वाहक आहेत. वासुदेवाचे रुप घेणाऱ्या अभिनेत्याला पुरस्कार आणि जो वासुदेव संस्कृतीचा खरा पाईक आहे तो मात्र उपेक्षित आहे.तुमच्या आमच्या पुढच्या पिढीसाठी हे संविधान टिकवावे लागेल.
इम्पेरिकल डाटा, सोशियल इकॉनॉमिक सर्व्हे करण्यात यावा. जात पंचायत रद्द कराव्या लागतील नव्या बदलाला सामोरे जाणाऱ्या भटक्या समाजाला शास्वत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे मत व्यक्त केले.
भटक्या विमुक्त हक्क परिषद अध्यक्ष धनांनाजय ओंबासे , महाराष्ट्र जोशी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप परदेशी,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष नागेश जाधव,प्रतीक गोसावी, तानाजी खेडेकर,नंदकुमार जोशी पवन अटक,नितीन गरवे, निलेश पारगे, पुनम तावरे, सुशीला मोरे, मिलिंद जोशी, कृष्णसुंदर गार्डन प्रोपायाटर संतोष गायकवाड, उद्योजक पिंटू इंगळे, प्राध्यापक कृष्णा जाधव, डी वाय एस पि अनिल पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र साळुंखे, सूखलाल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.