कोरेगाव भीमा – दिनांक ५ सप्टेंबर
कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांचा शिक्षक दिनी कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी श्री छत्रपती संभाजी महाराज, मा.राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात करण्यात आलो.
स्थानिक सल्लागार समिती, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व कोरेगाव भीमा ग्रामस्थ यांच्या वतीने प्राचार्य, प्रभारी पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना श्रीफळ – पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष रवींद्र फडतरे , विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बबुशा ढेरंगे ,शिक्षणतज्ज्ञ सिराज इनामदार,बापूसाहेब शिंदे हे उपस्थित होते. उपस्थितांनी भाषणात शिक्षकांचे महत्त्व, समाजात असलेली शिक्षकाची गरज सांगून शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य कुंभारकर एम.टी. यांनी भूषविले, प्रास्ताविक बेल्हेकर बी.पी. यांनी केले.शिक्षक मनोगत भुरे पी.आर. सूत्रसंचालन गावडे आर. आर. यांनी तर आभार कोणी डी.जी. यांनी मानले .