Thursday, November 21, 2024
Homeक्राइमकोरेगाव भीमा येथे सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास

कोरेगाव भीमा येथे सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास

चोरीमध्ये रोख रकमेसह १३ तोळे सोन्याच्या दागिने व मोबाईलचा सामावेश

कोरेगाव भीमा – दिनांक ३१ ऑगस्टकोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे तब्बल १३ तोळे सोन्याचे दागिन्यांसह २४,९६० रोख रक्कम व मोबाईल अशी ५,२७, ९६० रुपयांच्या चोरीची घटना घडली आहे. यावबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी विजया दिलीप जोशी (वय३७)वर्षे राहणार आनंदनगर कोरेगाव भिमा( मुळ रा . माणिकदौंडी ता.पाथर्डी जि . अहमदनगर ) यांनी तक्रार दाखल केली असून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी विजया जोशी,आनंदनगर येथे पती ,भाऊ व दोन मुलांसह राहण्यास असून दि.३० ऑगस्ट रोजी त्यांचे पती रात्रपाळी कामासाठी गेले होते. त्यानंतर सदर महिला व त्यांचा लहान मुलगाश झोपी गेल्या. महिलेच्या पुतण्या तेजस जोशी यांनी पहाटे सकाळी ५.३० ला आवाज दिला की तुमच्या घराचा दरवाजा कसा काय उघडा आहे . त्यावेळी संबधित महिला दरवाजा उघडा कसा पाहण्यासाठी आली असता घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीला आला.

चोरांनी घराच्या खिडकीचे ग्रिल तोडुन खिडकीतुन आतमध्ये हात घालून बंद घराचे कडी कोयडा काढुन आतुन बंद केलेला दरवाजा उघडुन घरामध्ये प्रवेश करुन लोखडी कपाटामधील सोन्याचे दागीने , रोख रक्कम व मोबाईल हँडसेट अशी ५,२७,९६० रुपायांची चोरी झाली असून कोरेगाव भिमा येथील मोठी वस्ती असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे ,सहाय्यक फौजदार अविनाश थोरात, हेड कॉन्स्टेबल प्रशांत गायकवाड,होनमाने, पोलीस नाईक चीतारे, दांडगे,पोलीस कॉन्स्टेबल रावडे ,लखन सिरस्कर पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी तात्काळ भेट देत पाहणी केली असून पुणे ग्रामीण फिंगर प्रिंट्स अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व कॉन्स्टेबल प्रशांत पवार करत आहेत.





संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!