कुलदीप मोहिते कराड
उंब्रज- उंब्रज (ता.कराड) येथील साई मेडिकल फाऊंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शैलेश मोहिते हे नेहमीच समाजाचे काही देणं लागतो या उदात्त हेतुने सामाजिक कार्यात अग्रेसर असुन सामाजिक बांधिलकी तुन विविध उपक्रम राबवत असतात ,वैद्यकीय,शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असुन गुणवंतांच्या पाठीवर नेहमीच ट्रस्टच्या माध्यमातून शाब्बासकीची थाप टाकत असतात .
धावरवाडी (ता.कराड) येथील सागर विश्वास कदम या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार साई मेडिकल फाऊंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे संस्थापक-अध्यक्ष शैलेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की,तुम्ही कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतले हे महत्त्वाचे नसुन तुम्ही किती जिद्द व चिकाटीने यश मिळवता हे महत्त्वाचे आहे,धावरवाडी सारख्या एका छोट्याशा खेड्यातील सर्व सामान्य कुटुंबातील एक विद्यार्थी जर तेथील जिल्हा परिषद शाळेत शिकुन सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होत असेल तर त्याचा आदर्श युवा पिढीने घ्यायला हवा .
कर सहाय्यक सागर कदम यांनी या सत्कार प्रसंगी, कराडच्या चोर येथे माध्यमीक शिक्षण तर कराडमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या मध्ये डिग्री घेऊन पुढील स्पर्धा परिक्षेचा अभ्यास कराड मधिल एस जी एम काॅलेजच्या बॅरीस्टर पि.जी.पाटील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय सहाय्यक व म्हाडा व कर सहाय्यक या तिन्ही ठिकाणी यश मिळवता आले हे सत्कार प्रसंगी सांगितले यावेळी प्रमुख उपस्थिती सुनील पवार, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शिवाजीनगर (उंब्रज), .सतीश साळुंखे, ,अजय थोरात,वेदांत मोहिते,विश्वास कदम व साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते