कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर सणसवाडी येथे नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने तब्बल दीड किलो चांदीचे शिवलिंग एका शिवभक्ताकडुन श्रींचे चरणी अर्पण करण्यात आले. दानशूर शिवभक्ताचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिवभक्ताने दानशूर म्हणून नाव लवण्यास नकार दिला असून हे गुप्त दान असल्याची प्रतिक्रया दिली आहे.
औद्योगिक नगरी सणसवाडी सह पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान व आराध्यदैवत असलेल्या श्री नरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी महाशिवरात्री ,श्रावणी सोमवार यांसह इतर महत्त्वाच्या धार्मिक दिनी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. श्री नरेश्वर महाराज मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे.सणसवाडी ग्राम पंचायत व श्री नरेश्वर महाराज मंदिर विकास समिती,ग्रामस्थ व दानशूरांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. वृक्ष लागवड ,परिसर सजावट,गार्डन तयार करणे ,मियावाकी गार्डन असे अनेक प्रकल्प येथे राबवले जात आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवलिंग महत्वाच्या सन,उत्सव व महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम प्रसंगी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सणसवाडी येथील श्री नरेश्वर महाराजांच्या मंदिर परिसराच्या विकासाचे काम सुरू असल्याने अनेक दानशूर भाविकांनी यासाठी मदत करावी तसेच पर्यावरण प्रेमींनी येथे वृक्ष लागवडीस योगदान द्यावे असे आवाहन पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी केले आहे.
शिवपुजारी दरेकर महाराज यांच्याकडे शिवलिंग सुपूर्त करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर ,सावता परिषद पुणे जिल्हाध्यक्ष गोरख भुजबळ , ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे ,सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सेसायटीचे माजी चेअरमन गोरक्षनाथ दरेकर, मानवाधिकार एवं सामाजिक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य सचिव विकाश हरगुडे उपस्थित होते.