दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेची ईडी कडून चौकशी
हेमंत पाटील कराड
कराड – कराड तालुक्यातील दि कराड जनता सहकारी बँक यांची केंद्रीय तपास यंत्रणा बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश वाठारकर यांची व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी सुरू होती बँकेच्या ५०० कोटी कर्ज वसुली न झाल्यामुळे झाल्यामुळे बँकही आर्थिक तोट्यामध्ये आली . रिझर्व बँकेने बँकेचा परवाना रद्द करून प्रशासन व व्यवस्थापन आले. बँक आर्थिक कर्ज प्रकरणी तपासणीच्या रडारवर आहेत .
कराड तालुक्यामध्ये दि कराड जनता बँक ही चर्चेचा विषय ठरली होती केंद्रीय तपास यंत्रणाचे अधिकारी यांनी दिवसभर कराडमध्ये तब्बल दहा तास बँकेचे मुख्य अधिकारी व तात्कालीन अध्यक्ष यांची चौकशी सुरू होती. राजेश वाठारकर हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांचे वडील विलास वाठारकर जिल्हा बँकेचे काही वर्षे संचालक होते त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये या ईडी चौकशीमुळे खळबळ उडाली आहे रिझर्व बँकेने बँकेचा परवाना रद्द करून तेथे प्रशासकीय व्यवस्था बँकेचे व्यवहार पाहत होती.दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या कर्ज खात्यांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दिवाळखोरीत निघालेल्या दि कराड जनता सहकारी बँकेच्या कर्ज खात्यांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने ईडी आता साताऱ्यात पोहोचल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांपूर्वी बॅंकेचा परवाना झाला रद्द – दोन वर्षापूर्वी रिझ्व्ह बँकेने दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. त्यानंतर सहकार खात्याने बँक दिवाळखोरीत निघाल्याचे जाहीर केले होते. कर्ज वाटपामध्ये सहकार कायद्याच्या नियमांची पायमल्ली झाली आहे. तसेच मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली आहेत. विनातारण कर्जे दिल्यामुळे बॅंकेचा कारभार ईडीच्या रडारवर आला आहे.
सीईओसह तत्कालीन अध्यक्षांची तब्बल दहा तास चौकशी – जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे ईडीने कर्जवसुलीच्या सद्यः स्थितीच्या अहवालाची तीन दिवसांपुर्वी मागणी केली होती. त्यानंतर ईडीचे दोन अधिकारी थेट कराडमध्ये दाखल झाले. बॅंकेच्या मुख्य शाखेत त्यांनी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सूर्यवंशी यांच्याकडे तब्बल दहा तास चौकशी केली.
५०० कोटींच्या कर्ज खात्यांच्या व्यवहारांची चौकशी – कराड जनता सहकारी बँकेने चार कर्जदारांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले होते. त्या चार कर्जदारांच्या थकीत कर्जाची रक्कम ५०० कोटींच्या आसपास आहे. बँकेला ती रक्कम वसूल करता आलेली नाही. या कर्जाच्या अनुषंगाने ईंडीकडून चौकशी सुरू आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीचे दोन अधिकारी ठाण मांडून आहेत.