ग्रीन वाघोली उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत १० हजार झाडांची लागवड व संवर्धन
कोरेगाव भीमा – दिनांक २४ जुलै
वाघोली ( ता.हवेली ) येथे ग्रीन वाघोली उपक्रमांतर्गत केसनंद रोड सिट्रॉन सोसायटी परिसरात दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यात वृक्षारोपण करून यावर्षीचा ग्रीन वाघोली उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुदृढ व सुरक्षित राहण्यासाठी ग्रीन वाघोली या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येत असते यासाठी समाजातील विविध घटक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात. समाजाची व निसर्गाची बांधिलकी जपणारी ग्रीन वाघोली टीम मोठ्या प्रमाणावर यासाठी मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे . पर्यावरणाचा समतोल राखला जावा,नागरिकांनी शुद्ध हवा व आरोग्यदायी वातावरण मिळावे , निसर्गाशी असणारी जवळीकता आणखी घनिष्ठ व्हावी यासाठी भाजपायुमो चे हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील यांच्या माध्यमातून भरघोस असे सामाजिक काम केले जात आहे .
ग्रीन वाघोली टिम मेम्बर व सोसायटी कमिटी मेम्बर मुरलीधर मोरे यांनी सर्व झाडे उपलब्ध करत या उपक्रमाची सुरवात केली. यावेळी भाजपायुमो हवेली तालुकाध्यक्ष अनिल दिलीप सातव पाटील, माजी उपसरपंच संदिप सातव पाटिल,भाजपा वाघोली शाखा उपाध्यक्ष संदीप वारे सोसायटीचे सभासद वैशाली मोरे,जितेंद्र अहिरे ,विनायक भंडारे ,जानेश कौल,राहुल बोरसे ,पवन कावडे,तुषार खुळगे मान्यवर उपस्थित होते
ग्रीन वाघोली फाउंडेशनच्या मार्फत मागील पाच वर्षांपासून दरवर्षी पावसाळा सुरू होण्या अगोदर डोंगर टेकड्या ,वाघोलीतील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, मंदिर परिसर तसेच रस्ते व सोसायटी परिसरातील अॅमेनिटी स्पेस रस्ते इ. भागात आतापर्यंत १० हजार पेक्षा अधिक वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन व संगोपन केले जात आहे.
यावर्षी देखील या उपक्रमाची सुरवात सिट्रॉन सोसायटी व मुरलीधर मोरे सर यांच्यामार्फत झाली आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाण्यास मोठा फायदा होणार असून असे विविध उपक्रम वाघोलीमध्ये राबवून ग्रीन वाघोली करण्यात आम्ही कायम अग्रेसर राहणार आहोत.