कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील वाडा पुनर्वसन फाट्यावर बंद पडलेला सिग्नल तसेच त्याच्या जवळच लावलेले बॅनर हे प्रवाशांच्या जीवावर बेतत असून आत्तापर्यंत या ठिकाणी बरेच अपघात झाले आहेत त्यात काही जणांना आपला प्राणही गमवावा लागला आहे.
प्रवास करताना वाहनचालकांना रस्ता ओलांडण्यासाठी या बंद पडलेला सिग्नल काहीच उपयोगाचा नसून या सिग्नलला जाहिरात बॅनर लावले जात असून यामुळे वाहन चालकांना व पादाचाऱ्यांना रस्ता ओलांडताना समोरून आलेले वाहन दिसत नाही तर वाहन चालकाला दुचाकीस्वार, पादाचारी दिसत नाही यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
बंद पडलेला सिग्नल असल्याने फक्त नावापुरता लावल्याचे दिसत असून प्रशासन मात्र याकडे डोळे झाकून दुर्लक्ष करताना दिसत आहे. सिग्नल असून नसल्यासारखा आहे.यामुळे तातडीने या सिग्नलला लावलेले बॅनर तातडीने हटवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
वाडा पुनर्वसन फाट्यावरील बंद पडलेले सिग्नल तातडीने दुरुस्त करण्यात यावेत व तेथे खांबाला व सिग्नलला लावण्यात आलेले बॅनर काढण्यात यावे . – प्रवीण गव्हाणे, सभासद शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन