बाल वारकऱ्यांचा नेत्रदीपक दिंडी सोहळा
सणसवाडी – दिनांक -०९ जुलै
सणसवाडी (ता.शिरूर ) येथील वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ ली ८ थीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हरिनामाचा गजर करत विठुरायाच्या भक्तिरसात दंग झाले .या बालचिमुकल्यांनी वारकरी पोशाख परिधान करून अवघा पंढरी सोहळा अवतारीत झाला होता. बाल वारकऱ्यांनी विठ्ठल-रुख्मिणी ,ज्ञानोबा, तुकोबा,गोरोबा,एकनाथ,जनाबाई,मीराबाई आदी संतांच्या पोशाख परिधान करून उपस्थित ग्रामस्थांना साक्षात पांडुरंगाचे दर्शन दिले तर मुलीनी डोक्यावर तुळस टाळ पखवादाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत संपूर्ण वसेवाडी, सणसवाडी परिसरात पायी दिंडी काढली.यावेळी मुलांनी व पालकांनी नाचत ,फुगड्या खेळून वारीचा आनंद लुटला. या दिंडीमध्ये पालखीची आकर्षक सजावट पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.विद्यार्थी – शिक्षकांनी व पालकांनी फुगडी खेळू वारीचा आनंद घेतला.ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी या बालवारकऱ्याना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच संगीता हरगुडे,माजी उपसरपंच विजयराज दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल दरेकर, सदस्य सेवागिरी रणपिसे ,संगीता नागरगोजे यासह ग्रामस्थ ,पालक उपस्थित होते.कार्यक्रमासाठी महिलांचा मोठा सहभाग होता.