दिड कोटी रूपयांच्या मुद्देमालासह ७ वाहने जप्त
हवेली प्रतिनिधी सुनील थोरात
हडपसर – दिनांक ८ जुलै हडपसर ( ता.हवेली ) हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकूळे यांच्या मार्गदर्नाखाली मोठी कार्यवाही करण्यात आली आहे .या कार्यवाहीत वाहनांसह एक कोटी चोपन्न लाख चोपन्न हजार पाचशे दहा रुपयांची दारू , गुटखा व गांजा जप्त करण्यात आला असून हडपसर पोलिसांची अवैध दारू, गुटखा व गांजा विकानाऱ्यांवरील ही जबर कार्यवाही समजण्यात येत आहे.
जून व जुलै महिन्यात हातभट्टी व विदेशी दारू, गुटखा व गांजा अशा अंमली पदार्थासह पकडण्याची मोठी कार्यवाही करण्यात आली असून अवैध रीतीने चालणाऱ्या धंद्यावर ही मोठी कार्यवाही असून ७ वाहनांसह दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे व हडपसर पोलीस तपास पथकाच्या या कामगिरीवर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
८ जुलैला मारूती इको वाहन क्र.(एम .एच १२-एस. ई – ०१८४ ) या वाहनातुन ब्रॅन्डेड दारूची गोवा ते पुणे अशी अवैध वाहतुक होत आहे अशी बातमी पोलीस अंमलदार अंकुश बनसुडे यांना मिळाल्यावरून हडपसर तपास पथकाने पाठलाग करून फुरसुंगी येथील मंतरवाडी चौकातील कृष्णा वडेवालेसमोर , आरोपी १ ) श्रीराम ज्ञानोबा तांबडे (वय २४ वर्ष , राहणार- उबाळे नगर , मॅपल हॉटेलच्या पाठीमागे , वाघोली ), २ ) दिपक कैलास परांडे (वय ३२ वर्षे , राहणार- रेणुकापार्क उबाळेनगर , वाघोली ) व ३ ) योगेश आनंत मोराळे (वय २२ वर्ष , राहणार- बाणेगाव , मु . पो.वाघी बाभळगाव , ता.केज , जि.बीड सध्या काळेपडळ , हडपसर ) यांच्या इको गाडीमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एकुण १०३२ बॉटल विदेशी कंपनीची दारु , वाहतुकीकरीता वापरेले वाहन व मोबाईल असा कि रु ५,२५,००० / – रुपये चा माल जप्त केला आहे .
हडपसर पोलीसांनी जुन २०२२ मध्ये केलेली दारू / अंमली पदार्थ वाहतुकीची कारवाई खालीलप्रमाणे –
१) दिनांक १९ मे रोजी ३लक्ष ६९ हजार रुपयांची ५० लिटर गावठी हातभट्टी दारुसह ,मोबाईल व मारुती सुझुकी अल्टो गाडी जप्त करण्यात आली.
२) ६ जून रोजी ८ लाख ०९ हजारांची ७७० लिटर गावठी हातभट्टी दारुसह पिकअप चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
३)२६ जून रोजी १ लाख ५४ हजार ८०० रुपयांची ४० लिटर हातभट्टी दारुसह रॉयल एनफिल्ड बुलेट जप्त करण्यात आली.
४) २९ जून ६२ लाख १८ हजार ७७० रुपयांचा गुटखा व आयशर ट्रक जप्त करण्यात आला.
५) २९ जून रोजी २० लाख ६२ हजार ९४० रुपयंचा ७३ किलो १४७ ग्रॅम गांजा व मारुती सुझुकी अल्टो जप्त करण्यात आली ६) २ जुलै रोजी ५ लाख ३१ हजार ५०० रुपयांची ३१५ लिटर हातभट्टी गावठी दारू व टेम्पो वाहन जप्त करण्यात आले.
७) ८ जुलै रोजी ५ लाख २५ हजार रुपयांची एकूण १०३२ विदेशी दारूच्या बाटल्या व मारुती इको गाडी जप्त करण्यात आली आहे.
हडपसर पोलीसांनी जुन २०२२ या एकाच महिन्यात अवैध दारू व अंमली पदार्थ वाहतुकीच्या वरिल ७ कारवायांमध्ये एकुण १,५४,५४,५९ ० / – चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .