कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.हवेली)श्री छञपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही तत्कालीन इतर सत्तेपेक्षा वेगळी असून तिच्या बळावरच हिंदवी स्वराज्याची स्थापना करून तिचा विस्तार केला. या युद्धनीतीचा अभ्यास आजच्या तरुणांनी केला पाहिजे असे शिवव्याख्याते बालाजी काशीद यांनी भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या शिवजयंती प्रसंगी मत व्यक्त केले.
आजच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी करताना शिवकाळातील विज्ञान समजावून घेण्यावर भर दिला पाहिजे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मत व्यक्त केले.एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी तुळापूर येथून शिवज्योत महाविद्यालयात आणली. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रथम गोळे, निकिता कुंजीर, अभिषेक गुरव, साक्षी भोसले, सायली कंद, पुनम रोकडे, वैष्णवी ठोंबरे या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे केली.इतिहास विभाग प्रमुख डॉ. भूषण फडतरे यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राबविलेल्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकामधून दिली रोहन खिलारे यांनी सूत्रसंचालन केले तर नेहल कांबळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रसंगी इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष वैष्णवी गवळी, आशुतोष खाडे, प्रथमेश दरेकर, यश पुंड, रोहन खिलारे व नेहल कांबळे यांनी केले.प्रा. संजय मानवतकर, प्रा. अंगद साखरे, प्रा.सचिन कांबळे, प्रा. डी एन पाटील, डॉ.विकास बहूले, शशिकांत केसकर, गिरीश शहा व सविता आवटे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष वैष्णवी गवळी, आशुतोष खाडे, प्रथमेश दरेकर, यश पुंड, रोहन खिलारे व नेहल कांबळे यांनी केले.