पुणे – मणेरवाडी(ता. हवेली) नंदनवन सोसायटी येथील १५ वर्षीय मुलगा प्रकाश हरीसिंग राजपुत याच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर मागील बाजुस, मानेवर मागील बाजुस व पाठीवर केलेल्या हल्ल्यात मृत्यु झाल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना बेड्या ठोकल्या असून अवघ्या सात तासांच्या आतमध्ये पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.(Pune Crime News)
सदर गुन्हयातील गुन्हा घडले बाबत कोणताही पुरावा हाती नसताना, कोणतेही सि सि टी व्ही फुटेज हाती नसताना केवळ तपास पथकांनी वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे व मिळाले माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील खुनाचा ६ ते ७ तासाच्या आत छडा लावुन सदरचा गुन्हा उघडकिस आणुन खुनाचा गुन्हा करणारे ०२ विधी संघर्षीत बालक यांची नावे निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हावेलिंपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचीन वांगडे यांनी लगेचच तपासाची सुत्रे हालवुन, पोलीस स्टेशनकडील दोन तपास पथके, यांना तपासकामी तात्काळ रवाना केली. सदर गुन्हयाचा तपास चालु असताना, पुन्हा स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व पौड पोलीस स्टेशन आणि वेल्हा पोलीस स्टेशन कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची तीन तपास पथके घटनास्थळी दाखल झाली व गुन्हाची माहिती घेवुन वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली. आरोपीचे शोधकामी रवाना करण्यात आली.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग ढोले पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर , हवेली पोलीस स्टेशन हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे , सपोनि विकास अडागळे, सपोनि सागर पवार, पो हवा संतोष तोडकर, दिनेश कोळेकर, अजय पाटसकर, अशोक तारु, विलास प्रधान, विजयकुमार कांबळे, पोलीस नाईक गणेश धनवे, दिपक गायकवाड, संतोष भापकर, राजेंद्र मुंढे, पो. कॉ. रजनिकांत खंडाळे, महेंद्र चौधरी, सचिन गुंड, व्यंकट काळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सावंत, सहा. फौ. हनुमंत पासलकर, पो हवा अजित भुजबळ, रामदास बाबर, दत्तात्रय तांबे, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेंडगे तसेच पौड पोलीस स्टेशनकडील पो हवा रॉकि देवकाते, सिदधेश पाटील, वेल्हा पोलीस स्टेशनकडील पोसई पडळकर, पोकों मोरे, पो कॉ मुळे यांनी केली असुन, सदर गुन्हयाचा पुढील तपास हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे करीत आहेत.