वयाच्या ७० व्या वर्षी ४,२०० कि.मी. अंतर पायी चालत पुर्ण केले.
पुणे – पिंपळोली (ता.मुळशी) येथील ह.भ.प.महादेव महाराज गवारी – मुळशीकर यांनी वयाच्या ७० व्या वर्षी ओंकारेश्वर ( मध्यप्रदेश ) येथुन पायी चालत नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली. साडे तीन महिने अविरतपणे पायी चालत ४,२०० कि.मी. अंतर पुर्ण केले. त्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल पिंपळोली ग्रामस्थांनी त्यांची पुर्ण गावातुन वाजत – गाजत , भजन म्हणत मिरवणुक काढली. गावात ठिकठिकाणी त्यांचे औक्षण केले तर काही ठिकाणी त्यांचा सत्कार केला.
गुरुवर्य ह.भ.प बंडातात्या महाराज कराडकर यांचे शिष्य आहेत. गेले अनेक वर्षांपासुन ते पंढरपुरची आषाढी वारी करीत आहेत.
यानिमित्ताने आळंदीमधील कराडकर धर्मशाळेत ह.भ.प. महावीर महाराज सुर्यवंशी यांची किर्तनरुपी सेवा झाली. व वारकरी साधकांना अन्नदान केले. यावेळी प.पु. परशुरामजी महाराज वाघ, बाळकृष्ण महाराज कोंडे, काळोखे महाराज, राजाभाऊ महाराज, पंढरीनाथ महाराज पारखी, तुकाराम महाराज खानेकर यांच्यासह शेकडो वारकरी साधक , आप्तेष्ट मंडळी व नातेवाईक उपस्थित होते.