१० आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांसह ४ टोळ्यांना ताब्यात घेत टोळीतील गुन्हेगारांना मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार
पुणे – हडपसर ( ता.हवेली) येथील पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही करत आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आणत चोरांना बेड्या ठोकल्या असून यामध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची मनिमाळ हिसकवली होती तसेच एक पर्स हिसकावण्याच्या प्रकार झाला त्याचबरोबर बसची वाट पाहणाऱ्या एकाच्या डाव्या हातावर धारदार शस्त्राने वार करत त्यांच्यासह दोन मित्रांचे मोबाईल व रोख रक्कम चोरीची घटना घडली होती प्रभावती पोपट जावळे (वय ७४ वर्षे ) मांजरी बुद्रुक येथील दिनांक २० जून रोजी सकाळी आठला राहते घराजवळ वॉकींग वरून घरी आलेल्या असताना पार्किंगमध्ये एका मोटारसायकल वरील तीन अनोळखी लोकांनी त्यांचे जवळ येवून त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांचे गळयातील सोन्याची मनीमाळ जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याची घटना घटना घडली होती.( Crime news)
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, मनोज सुरवसे, अमोल दणके, शाहीद शेख, कुंडलीक केसकर यांच्या तपास पथकाने आरोपी आलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज मांजरी ते यवत तसेच परत यवत ते मंगळवार पेठ पर्यंतचे ४५० हून अधिक फुटेज तपासून आरोपीचा आरोपींना बेद्यावठोकल्या यामध्ये आरोपी १) स्वप्नील ईश्वर केंदळे (वय ३० वर्ष) अहमदनगर सध्या पुणे यास ताब्यात घेतल्यावर त्याने साथीदार २) अमोल भास्कर शेलार, अहमदनगर आरोपी ३) अमर चिरू कांबळे रा हडपसर, विमानतळ, या पोलीस ठाणे हद्दीत चैनचोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपी यांनी चोरून नेलेले सोन्याचे दागिने हे आरोपी ४) विजय रामकृष्ण देडगावकर (वय ६३) वर्ष रा. कोल्हार अहमनगर राहता यास विकले असल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तपासा दरम्यान आरोपीकडून १) हडपसर व विमाननगर चैन चोरी गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे हे करीत आहेत. ( Crime News)
जबरी चोरीच्या दोन घटनांमध् दिनांक २१जून रोजी सायंकाळी मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी मांजरी येथे फिर्यादीच्या पाठीमागुन येवून त्यांची पर्स जबरदस्तीने खेचुन निघून गेले होते. दुसऱ्या घटनेत दिनांक २४जून रोजी रात्री २ चे सुमारास हडपसर येथे बसची वाट पाहत बसले असताना दोन दुचाकीवरील आलेल्या इमसांनी फिर्यादी यांचे हातावर धारदार हत्याराने जोरात फटाका मारुन त्यांचे डावे हाताला दुखापत करून फिर्यादी व त्यांचे मित्र यांचे मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेवून गेले होते.
दाखल दोन्ही गुन्ह्यांचा तपास तपास पथक अधिकारी आणि अंमलदार हे करीत असताना सपोनिरी विजयकुमार शिंदे आणि पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणा आधारे आरोपी १) अजय युसुफ मोजन (वय २० वर्ष) केसनंद आरोपी २) यतीन ऊर्फ यत्या उदय पाटील (वय २१ वर्ष) रा. कोंढापूरी , ता. शिरूर यांना रांजणगाव येथून ताब्यात घेतले व त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली देवून गुन्हा करताना वापरलेली लाल रंगाची यामाहा मोटारसायकल ही रांजणगाव येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपींकडून दोन मोबाईल, एक यामाहा मोटारसायकल असा किं.रु. १,२०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९२७/ २०२३ भा.दं.वि. कलम ३९४,३५२,३४ मधिल आरोपी १) अथर्व प्रदीप शेडगे (वय १८ वर्ष)ला, पर्वती दर्शन पुणे. आरोपी २) प्रणव शंकर डावरे (वय १८ वर्ष) अपर इंदिरानगर पुणे. तसेच २ विधीसंघर्षित यांना दत्तवाडी, कोंढवा, बिबवेवाडी येथून ताब्यात घेत त्यांचेकडील तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दिनांक २७ जून रोजी वडगावशेरी येथे एका इसमास धाक दाखवून त्याचेवर कोयत्याने वार करून त्याची स्प्लेन्डर मोटारसायकल जबरदस्तीने चोरून आणल्याचे सांगीतले. आरोपीकडून २ मोबाईल फोन, स्प्लेन्डर मोटारसायकल, दोन ॲक्टिवा असा २,३०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.( Crime News)
दिनांक २८जून रोजी सायकांळी हिराराम चनाराम देवासी त्यांचे दुकानात काम करत असताना आरोपी आशुतोष शिवाजी पवार राजिवन रा.शेवाळवाडी, गौरव संतोष अडसूळ रा. शेवाळवाडी व रवि संभाजी हमारे रा.शेवाळवाडी यांनी दुकानातील कॅश काऊंटर तसेच दुकानातील इतर मिठाईचे काऊंटर, चार फ्रिजर कोल्ड्रींगचे काया व दुकानातील काचा व दुकानाच्या बाहेर असलेले नाष्टा काऊन्टरच्या काचा हातातील धारदार शास्त्राने फोडून नाष्टा काऊन्टर मधील रोख रक्कम २०००/- रुपये जबरदस्तीने चोरी करुन त्यांच्या हातातील धारदार शस्त्र हे हवेत फिरवून खबरदार कोणी मध्ये आलातर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेले होते.
या गुन्ह्यात खासगी कामासाठी आलेले अंमलदार विजयकुमार ढाकणे यांनी आरोपींचा पाठलाग करून आरोपी १) गौरव संतोष अडसुळे वय १९ वर्ष रा. शेवाळवाडी मांजरी पुणे २) रवी संभाजी हजारे वय १९ वर्ष रा. शेवाळवाडी हडपसर पुणे. ३) नयन उर्फ अभिषेक हरिदास भोसले वय २० वर्ष रा. सदर व १ विधीसंघर्षित बालक यांना अटक / ताब्यात घेण्यात आले आहे.अशा प्रकारे हडपसर पोलीस ठाणेकडील तपासपथकाकडून एका आठवड्यामध्ये ८ जबरी चोन्या आणि १ वाहनचोरी असे ९ गुन्हे उघडकीस आणून १० आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांसह ४ टोळ्यांना ताब्यात घेतले आहेत. टोळीतील गुन्हेगारांना मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा सो, व मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ विक्रांत देशमुख यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे अश्विनी राख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन अरविंद गोकुळे , पुणे शहर, विश्वास डगळे , पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, कुंडलीक केसकर, रशिद शेख, अजित मदने, चंद्रकांत रेजीलवाड यांच्या पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.(Pune city police)