‘याला मंत्री होण्याची स्वप्न पडतात. पण मंत्री होण्याआधी तू आमदार कसा होतो, तेच बघतो’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर मतदारसंघातील सभेत थेट आमदार अशोक पवार यांना चॅलेंज दिले.
आमदार रोहित पवारांनी आमदार अशोक पवारांच्या भेटीनंतर ट्वीट करत कोणाचेही नाव न घेता कसा निवडून येत नाही तेच पाहतो म्हणत इशाराच दिला आहे.
अजितदादा धमकी देतात, कसा निवडून येतो तेच पाहतो!… आणि हेच ते निष्ठावंत आमदार अशोक बापू पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ बैठकीला रवाना झालो!
काय म्हणाले होते अजित पवार? – शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस – महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या आमदाराला जाहीर आव्हान दिले.शिरुर मधील सभेत अजित पवार म्हणाले की, महायुतीसोबत जाऊन आम्ही शपथ घेतली.
तेव्हा दिलीप वळसे पाटील यांचा शपथविधी झाला तेव्हा याची सटकली. तो म्हणाला दादांनी याला मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. आता आपलं काही जमणार नाही. त्याच्या आजुबाजूला बसलेल्या आमदारांनी मला हे मी घरी आल्यावर सांगितलं. त्याला साहेबांनी मंत्रीपदाचं गाजर दाखवलं. पुढच्यावेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्यावेळेस मंत्री होण्यासाठी या पठ्ठ्याने कारखान्याची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालास, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना दिले.