शिक्रापूर – श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा (ता शिरूर ) येथे रांगोळी ,निबंध स्पर्धा घेऊन स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून साजरा करण्यात आला. आलेगाव पागामध्ये प्रभात फेरी काढून हर घर तिरंगा घरघर तिरंगा चा नारा देत ग्रामस्थांमध्ये जागृती केली.
विद्यालयाचे ध्वजारोहण माजी सैनिक सुभाष दिवटे यांच्या हस्ते तर प्राथमिक शाळा बेनके नगरचे ध्वजारोहण माजी सैनिक बाळासाहेब बेनके यांनी , जिल्हा परिषद प्राथमिक शाळचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव शिंदे यांनी केले, आलेगावपागाचे सरपंच आप्पासाहेब बेनके यांच्या हस्ते आलेगाव पागा ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले.
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तसेच सेकंडरी स्कूल एम्पलोयीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबईचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाला उपसरपंच लिलाबाई अशोक भोसले ,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष आरवडे, तुकाराम मोरे, रामदास वाकचौरे, पोलीस पाटील विशाल अवचिते ,मार्केट कमिटीच्या सदस्य छाया बेनके, माजी सरपंच सतीश आरवडे, कालिदास हरिअर ,शिवसेना नेते लालासाहेब वाकचौरे , सतीष गुंजाळ , बाळासाहेब वाकचौरे ,लक्ष्मण हरिहर, मनोहर भोसले कृषी अधिकारी रोहन भोसले, पोलीस निरीक्षक हेमंत ढोले ,अंबादास गावडे, संभाजी कुटे,दिलीप वाळके, शरद शेलार, बाबुराव मगर ,मच्छिंद्र बेनके, सुहास बिडगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले.