कोरेगाव भीमा – दिनांक १५ ऑगस्टबकोरी ( ता.शिरूर) येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वाघोली येथील शिवशक्ती तरुण मंडळाचे माध्यमातून ३०० देशी झाडांचे केले वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे हस्ते झेंडावंदन करण्यात येऊन वृक्षारोपणास करण्यात आले. यावेळी शिवशक्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते यापुढे नेहमीच बकोरी देवराई वनराई प्रकल्पात मदत करणार असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ कैलास सातव यांनी सांगितले.
यावेळी वन विभागाचे अधिकारी वायकर साहेब, गायकवाड साहेब तसेच बकोरी चे ऊद्योजक सत्यवान गायकवाड, चेअरमन बाळासाहेब वारघडे,बंटी वारघडे,सागर वारघडे , संतोष वारघडे, संदिप कोलते, नवनाथ शितकल, माहिती सेवा समितीचे कमलेश बहीरट, सतीश जगताप,मोहीनी तांबे,सुरेश जगताप,रवि सलगीरे वाघोली येथील शिवशक्ती तरुण मंडळाचे बाळासाहेब हरगुडे,गजानन हरगुडे,कैलास सातव, संतोष सातव, अमित काळे, नवनाथ शेळके, गणेश सातव, नाना सातव,मयूर सातव, अजित काळे,अनिकेत सातव,महेश तावरे, , मंगेश देशमुख, शुभम काळे,आकाश गाडेकर, शिवाजी सातपुते, ओंकार सातव, सुनील सातव, अप्पासाहेब सातव , शिवाजी वाघमोडे, डॉ सांगळे, गणेश जाधव,अनील जगताप , धनराज वारघडे, विशाल वारघडे,संकेत वारघडे यांचे सहीत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.धनश्री वारघडे यांनी सुंदर रांगोळी काढून सजावट केली होती.माहिती सेवा समितीचे अध्यक्ष बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे प्रमुख चंद्रकांत वारघडे यांनी सर्वांचे आभार मानले. गजानन हरगुडे यांनी त्याठिकाणी ठीबकचे कामासाठी पाच हजार रुपयांची मदत करत वृक्षारोपण कार्यास प्रेरणा दिली तसेच डॉ. सांगळे यांनी ५ झाडे दान दिली. वृक्षारोपणानंतर चहा व अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी बाकोरी देवराई वनराई प्रकल्पास भेट देऊन सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
सर्व गणेश मंडळांनी यावर्षी गणपती बसवताना थोडाफार खर्च कमी करून वृक्षारोपण करण्यासाठी संस्थांना मदत करावी व पर्यावरण पूरक गणेशोस्तव साजरा करण्यात यावा. – अध्यक्ष चंद्रकांत वारघडे . माहिती सेवा समिती