शिक्रापूर – भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे विचार आणखी प्रभावीपणे रुजवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असून क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी केले.
भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ (ता.शिरूर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ऋतुजा मैड ,साक्षी थिटे, वैष्णवी फटांगडे, श्रृतिका चापोडे, साक्षी आदक या विद्यार्थिनींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार, समाजसुधारक अशा विविध प्रांतात काम करणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारा स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार ,थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपप्राचार्य सुदाम पिंगळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे,भैरवनाथ विद्यामंदिर सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक रोहिदास चौधरी ,आनंदा गावडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे,आण्णा ओहोळ, निळकंठ पाटील,काळूराम गव्हाणे,संदीप गवारे,अरुण निकम,अतुल लिमगुडे,किरण रेटवडे,सुनिल जाधव,देवा शेळके,भरत जाधव,रेखा पलांडे, रोहिणी जाधव,विजया धुमाळ,जयश्री कोहीनकर, शितल सरोदे, कीर्ती कापरे, कल्पना चौधरी,अश्विनी यादव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष क्षीरसागर यांनी केले.