कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील मुख्य वढू चौकातील रस्त्याच्या बाजूला जीवन हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल,श्रीराम मेडिकल, श्रीकृष्ण मेडिकल, जीवन मेडिकल, वैष्णवी सुपर मार्केट अशा मुख्यकोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील मुख्य वढू चौकातील रस्त्याच्या बाजूला जीवन हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल,श्रीराम मेडिकल, श्रीकृष्ण मेडिकल, जीवन मेडिकल, वैष्णवी सुपर मार्केट अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बातमी प्रसारित होताच कोरेगाव भीमा पंचायतीने तातडीने दखल घेत काही तासातच जे.सी.बी पाठवत काम सुरू केल्याने स्थानिकांनी ‘स्वराज्य राष्ट्र‘ चे आभार मानले.
रहदारीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बातमी प्रसारित होताच कोरेगाव भीमा पंचायतीने तातडीने दखल घेत काही तासातच जे.सी.बी पाठवत काम सुरू केल्याने स्थानिकांनी ‘स्वराज्य राष्ट्र‘ चे आभार मानले.
वढू बुद्रुक चौकातील रस्त्यावरून विद्यार्थी,महिला भगिनी,कामगार वर्ग,व्यापारी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून नागरिकांना प्रवास करताना खराब पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी साठल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. याबाबत बातमी प्रसारित झाल्याने स्थानिक कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीने तातडीने जे.सी.बी. पाठवत काम सुरू केले आहे.