शासनस्तरावर अकादमी स्थापन करण्यास उदासीनता आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव हिच्या स्मृतिदिनी अनेकांनी व्यक्त केली खंत
प्रतिक मिसाळ सातारा
सातारा – कोणत्याही सोयी – सुविधा नसताना , कौटुंबिक परिस्थिती बेताचीच , तसेच शारीरिक उंची कमी असूनही नंदा जाधव हिने शिवछत्रपती पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय पातळीवरचे २३ पुरस्कार मिळवले. खडतर परिस्थितीतून यश संपादन केलेल्या सुवर्णकन्या नंदा जाधव हिच्या नावाने क्रीडा अकादमी स्थापन करत ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी आवश्यक असलेली क्रीडा अकादमी स्थापन करण्यासाठी शासकीय स्तरावरून उदासीनता दिसत असून अकादमी स्थापण्यास हवा असणारा पाहिजे तसा प्रतिसाद शासनस्तरावर मिळत नाही अशी खंत वाटते असे विचार नंदा जाधवच्या स्मृतिदिनी सर्वच वक्त्यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठान व संभाजीनगर ग्रामपंचायत तसेच सत्वशीलानगर मधील ग्रामस्थ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान व इतर कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी संभाजीनगर ग्रामपंचायतचे सरपंच सतीश माने ,प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके , क्रिडा संघटक सुरेश साधले , आनंदराव कणसे , कांबळे गुरुजी हे उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या धावपटू सुवर्णकन्या नंदा जाधव यांचा स्मृतिदिन हा त्यांची नव्या खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठीच साजरा केला जातो तसेच नंदा जाधव यांचे कार्यकर्तृत्व पुन्हा नव्या पिढी पुढे यावे हीच भावना त्या पाठीमागे असते व त्या दृष्टीने या परिसरातील नागरिकांनी हा चांगला पायंडा पाडलेला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी संभाजीनगर या ग्रामपंचायतीतील सत्वशीला नगर येथे बोलताना व्यक्त केले.
नंदा जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच दीप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी नंदा जाधव यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा देणारी आनंद कणसे , सरपंच सतीश माने यांची भाषणे झाली. प्रास्ताविक क्रीडा संघटक सुरेश साधले यांनी केले. त्यांनी नंदा जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. ॲड सागर जाधव यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चनाताई देशमुख , उपसरपंच काशिनाथ गोरड , डॉ. प्रवीण जाधव ,चेअरमन हिवाळे , भारती पोळ , अमित टेलर्स , सुजित चावरे ,वैभव फडतरे,अमोल तांगडे , महेश कदम , देवेंद्र देशमुख , आनंद घाडगे , नंदू शेठ नलावडे गिरीश ठेंबरे , तसेच पत्रकार प्रगती जाधव- पाटील व त्यांचे सहकारी आदी उपस्थित होते. लॉकडाऊन ग्रुप मित्र मंडळ व अमर पवार आणि राहुल गोडसे मित्रपरिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी २२१ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले असल्याची माहिती डॉ.प्रविण जाधव यांनी दिली.