Thursday, November 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोरेगाव भीमा येथे उत्साहात साजरी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोरेगाव भीमा येथे उत्साहात साजरी

राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे यांसारखे महापुरुष जन्माला आले नसते तर वंचित समाज, कायमचा भरकटला असता – सरपंच अमोल गव्हाणे

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे साहित्यरत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या एली अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, वैचारिक उत्तुंग भरारी असणारे, लोककवी , लेखक , शाहिरी अशा विविध प्रतिभा त्यांच्या अंगी होत्या . वंचित , गोरगरीब व कामगार यांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिजवणारे, लोककलेला समाजप्रतिष्ठा मिळवून देणारे, कथा , कादंबरी कवन आणि शाहिरीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडणारे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.

नवजीवन मनोरूग्ण व व्यसन मुक्ती केंद्र कोरेगाव भीमा येथे सरपंच अमोल गव्हाणे व पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी दवने , नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक ओम डोलारे ,वरीष्ठ लेखापाल बाबुराव गायकवाड , समुपदेशक पायल डोळस ,दिपीका अलगुले किरण काळे, सुजित भोसले , मेडीकल इन्चार्ज भताने , काळजी वाहक लखन कांबळे,अनिकेत रायभोळे पाटील हे होते . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजित भोसले यांनी तर आभारप्रदर्शन पायल यांनी केले .

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्व समाज घटकांपर्यंत पोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम अण्णाभाऊंनी केले. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे यांसारखे महापुरुष जन्माला आले नसते तर वंचित समाज, कायमचा भरकटला असता . अण्णाभाऊंनी स्वतःचा संसार स्वत : चे शरीर याकडे लक्ष न देता केवळ समाजहिताचे काम केले . संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय व वंदनीय आहे. – सरपंच अमोल गव्हाणे, कोरेगाव भीमा

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!