अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोरेगाव भीमा येथे पुणे नगर महामार्गावर रंबलर बनवण्यास तातडीने सुरुवात
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे पुणे-नगर हायवे वर वाडागाव फाटा येथे दोन अपघातात दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला होता तसेच महामार्गावर आपघातामध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली असल्याने पुणे – नगर महामार्गावर कोल्हापुर महामार्गाच्याधर्तीवर पुण्याकडून नगरकडे जाताना पुलाच्या जवळ गणेश भुवन समोर, डिंग्रजवाडी फाटा , वाडागाव फाटा, वढू चौक याठिकाणी वाहनांची गती जास्त असल्याने अपघात जास्त होत असल्याने या ठिकाणी कोल्हापुर महामार्गाच्या धर्तीवर स्पीडब्रेकर / रंबलर बसविण्याची मागणी ग्राम पंचायत कोरेगाव भीमा व ग्रामस्थांकडून करण्यात आली होती याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभार्ई यांनी तातडीने आदेश देत काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पुणे बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांचे आभार मानले.
कोरेगाव भीमा येथील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने पुणे नगर महामार्गावर प्रवास करताना अपघात होऊ नये तसेच वाहनचालकांना वेगावर मर्यादा ठेवण्यासाठी , गावातील रहदारी लक्षात यावी यासाठी वेगावर नियंत्रण ठेवणे याबाबत रंबलर आवश्यक होते. याबाबत ग्रामस्थ व ग्राम पंचायतीने मागणी करताच बांधकाम विभागाच्या वतीने तातडीने अवघ्या दोनच दिवसात काम सुरू केल्याने बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांची कार्यतत्परता पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.