साताऱ्याच्या सुपुत्राला एक आगळी वेगळी बळीराजाची सहृदय भेट
सातारा ( हेमंत पाटील)
सातारा – सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आपले प्रेम एका अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याने सध्या हा तरुण व त्याचे प्रेम साताऱ्यास इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय झाला आहे.
साताऱ्यातील अजनुज गावच्या एका शेतकरी चित्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चित्र आपल्या बैलाच्या अंगावर काढून आपली भावना व प्रेम व्यक्त केले आहे. पारगाव खंडाळा गावचा अजणूज गावातील एक चित्रकार प्रशांत मोहिते यांनी बेंदूर (बैलपोळा) या सणाच्या दिवशी चक्क आपल्या बैलाच्या अंगावर सातारा जिल्ह्यातील दरेगावचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच प्रेम व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला या आनंदात अजूनच पारगाव खंडाळा येथील प्रशांत मोहिते या एक चित्रकार शेतकऱ्याने ज्याला आपल्या मनातल्या भावना बेंदुर( बैलपोळा) सणाच्या दिवशी रंगरंगोटी करताना आपल्या भावना मांडल्या चित्रकलेच्या कुंचल्यातून इतक्या अप्रतिम व सुंदरेतेने व्यक्त झाल्या आहेत की, सातारा जिल्ह्याला मिळालेले मुख्यमंत्री पद हे सातारकरांच्या अभिमानाचा विषय झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या रूपाने साताऱ्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे.
सातारा जिल्हा हा मोठी राजकीय व सांस्कृतिक व दैदिप्यमान ऐतिहासिक परंपरा असलेला जिल्हा असून या जिल्ह्याने आत्तापर्यंत चार मुख्यमंत्री दिले आहे.
सातारा जिल्ह्यातील चार मुख्यमंत्री त्यांचा कालावधी व उल्लेखनीय कामगिरी –
१)यशवंतराव बनले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री – कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. १ मे १९६० रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्रीपदावर केली. त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. पंचायत राज व्यवस्था कृषी औद्योगिक धोरण, सहकार चळवळीचा पाया त्यांनी घातला.
२)बॅ. बाबासाहेब भोसले वर्षभर होते मुख्यमंत्री – बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी वर्षभरातील मुख्यमंत्री पदाच्या काळात दहावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
३) पृथ्वीराज चव्हाण उच्चशिक्षित मुख्यमंत्री – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे १० नोव्हेंबर, २०१० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कुटुंबीयांचा समृद्ध राजकीय वारसा लाभलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी निष्कलंकपणे कारभार करून मुख्यमंत्री पदावर आपली छाप सोडली.
४)एकनाथ शिंदे – शिवसेनेचे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते तर २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. (२००४, २००९, २०१४ आणि २०१९) असे चार वेळा आमदार झाले असून यावेळी ते महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.