Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यासातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे २० मेगावॅट चे वीज निर्मिती उपकेंद्रासाठी महावितरणकडुन...

सातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे २० मेगावॅट चे वीज निर्मिती उपकेंद्रासाठी महावितरणकडुन ५ कोटीचा निधी मंजूर.

प्रतिनिधी मिलिंदा पवार -सातारा

सातारा – दिनांक ११ फेब्रुवारी

सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाऊस येथीलजागेमध्ये २० मेगावॅटची विज निर्मितीचे उपकेंद्र मंजुर करण्यात आले आहे, या प्रकल्पासाठी महावितरण च्या माध्यमातुन ५ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कामाची लवकरच सुरूवात होणार असून या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परीसर लोड शेडिंग मुक्त होणार आहे.

सातारा शहराच्या विकासासाठी धोरणात्मक पाऊले उचलण्याचे संकेत इनोवेटीव सातारा या माध्यमातुन दिले होते. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अमंलबजावणी आता सुरू झाली आहे. सातारा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोड शेडींग ची समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नामुळे महावितरणने सातारा आणि ग्रामिण भागासाठी २० मेगावट चे विज निर्मिती करणारे उपकेंद्र मंजुर केले आहे.सातारा नगरपालिकेच्या मालकीचे यवतेश्वर घाट परिसरात पॉवर हाउस जलशुद्धीकरण आहे. येथे विज निर्मितीचे छोटेखानी युनिट चालवले जात होते. या परिसरात २० मेगा बॅट उपकेंद्रासाठी १५ गुंठे जागा देण्याचे धोरणनिश्चित करण्यात आले आहे.

या उपकेंद्राच्या निर्मितीमुळे सातारा शहर आणि परिसर येथील पुढील २५ वर्षासाठी विजेची समस्या सुटणार आहे. कण्हेर पाणीपुरवठा योजना व कास पाणीपुरवठा व तत्सम कारणासाठी जी वीज, शेंद्रे एक्सप्रेस फिडर कडुन घ्यावी लागते त्याचा सर्वोत्तम पर्याय या निर्मिती उपकेंद्रा मुळे होणार आहे. विविध पाणी उपसा योजनांना सुद्धा येथुन बीज कनेक्शन देणे शक्य होणार आहे.

महावितरण व सातारा नगरपालिका यांच्या समन्वयातुन हा प्रकल्प उभारला जात असुन या प्रकल्पाचा सातारा शहरासाठी आणि शहर ग्रामीण भागातील लघुउद्योजकांसाठी विशेषत्वाने फायदा होणार आहे. एकीकडे लोड शेडींग मुळे सातारा औद्योगिक वसाहतीचे नूकसान होत आहे. मात्र २० मेगा बॅट च्या वीज निर्मिती उपकेंद्रामुळे शहरात छोट्या लघुउद्योजकांना मोठा वाव मिळणार आहे.विकास हे सातारा विकास आघाडीचे मुख्य धोरण राहीले आहे. कास धरणाच्या उंची प्रकल्पानंतर २० मेगावॅट उपकेंद्र मंजुर करून देणे उद्दीष्ट

असून या प्रकल्पात महावितरण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. साताऱ्यात कोणत्याही मुलभुत आणि पायाभुत सुविधांची कमतरता भासरणार नाही या करीता आम्ही वचन बद्ध आहोत. त्या दृष्टीने विविध विकास कामांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. असे सातारा विकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!