सणसवाडी येथील विमानतळ (शिवमल्हार नगर) मधील नागरिकांची मीटिंग घेत अडचणी समजून घेत रस्त्याच्या कामासाठी लगेच जी सी बी बोलावत त्याच क्षणी भूमिपूजन की लगेच कामाला सुरुवात करत मागील दहा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अवघ्या काही तासांमध्ये सोडवत महिला सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी एक आगळी वेगळी कामगिरी केल्याने सणसवाडी येथील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील विमानतळ (शिवमल्हार नगर) मधील नागरिकांचा मागील दहा वर्षांपासून रस्ता व सांडपाणी लाईन यांचा प्रश्न प्रलंबित होता.याबतीत सरपंच सुवर्ण रामदास दरेकर यांनी विमानतळ (शिवमल्हार नगर) मधील नागरिकांची मीटिंग घेत अडचणी समजून घेत त्यांच्या समस्या सोडवल्या त्यांच्याशी संवाद साधला तसेच रस्त्याच्या कामासाठी लगेच जी सी बी बोलावत त्याच क्षणी भूमिपूजन की लगेच कामाला सुरुवात करत मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अवघ्या काही तासांमध्ये सोडवत महिला सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी एक आगळी वेगळी कामगिरी केल्याने शिवमल्हार नगर येथील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
सणसवाडी येथील विमानतळ ( शिवमल्हार नगर) येथील रस्ता व सांडपाणी लाईन यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न मागील दहा वर्षांपासून प्रलंबित होता.याबाबत अनेक बैठका झाल्या पण प्रश्न सुटत नव्हता.याबाबत नागरिकांनी सणसवाडी ग्राम नगरीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांना याबाबत लक्ष देत प्रश्न सोडवण्याची विनंती केली त्यावर सरपंच सुवर्णा दरेकर यांनी तातडीने नागरिकांची मीटिंग घेत त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले व रस्त्याचे आणि सांडपाणी लाईनचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण असून सर्वांनी त्याला सहकार्य करणे गरजेचे आहे असे आवाहन करताच नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणार असे सांगितले यावर तातडीने सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
याकामी त्यांनी माजी सरपंच ॲड विजयराज दरेकर, सागर दरेकर यांनी मोलाचे योगदान या बैठकीला विमानतळ येथील माजी चेअरमन सुहास दरेकर, शिवसेना नेते सतीश दरेकर, गोरख शेळके, महेश दरेकर, अलका दरेकर, आनंदराव शेळके,सिताराम कांचन ,दिगंबर दरेकर, पप्पू मिडगुले, बाजीराव शेळके यांच्यासह विमानतळ (शिवमल्हार नगर) येथील रहिवासी ,नागरिक, महिला भगिनी, ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान लाभले.
याकामी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांना उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, सुनंदा नवनाथ दरेकर, स्नेहल राजेश भुजबळ,माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, शशिकला सातपुते,रूपाली दरेकर, ललिता दरेकर,अक्षय कानडे, तनुजा दरेकर, मोहन हरगुडे , राहुल हरगुडे, ग्राम विकास अधिकारी बाळणाथ पवणे यांनी मोलाचे सहकार्य केले.