कंपाऊंड वरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह साथीदाराला पकडले नागरिकांनी
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील शिवम मंगला कार्यालयात श्री स्वामी समर्थ मंदिरांचा धार्मिक कार्यक्रम असल्याने मोठ्या संख्येने भाविक भक्त व महिला भगिनी उपस्थित होत्या यावेळी चोरांनी ६ लाख ३० हजारांचे दागिने चोरीला गेले असल्याबाबत माजी सरपंच सुरेश हरगुडे यांच्यासह आयोजकांना माहिती मिळाल्यावर त्यांनी गेट बंद केले व ओळखीच्या लोकांना जाऊन दिले यावेळी संशयित महिला सुनिता जयाजी मीसाळ हिने कंपाऊंड वरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिला साथीदार जयाजी सुपडाजी मीसाळ यांच्यासह पकडले असून आणखी पळून गेलेल्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कुसुम काळुराम दरेकर वय ४९ वर्ष यांनी फिर्याद दिली असून स्वामी समर्थ मंदिराच्या धा कार्यक्रम संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी रांगेमध्ये थांबले होते त्यावेळी तेथे जास्त प्रमाणात गर्दी झाली असल्याने रांगेतून बाहेर आल्यावर गळ्यातील गंठण कोटी झाल्याबाबत कार्यक्रम आयोजक माजी सुरेश हरगुडे व इतरांना सांगीतले. जमलेल्या महीला व पुरुष यांना जागेवरच थांबुन मंगलकार्यालयाचे सर्व गेट बंद केले. यानंतर आयोजकांनी गावातील ओळखीचे महीला व पुरुष यांना बाहेर सोडत होते त्यावेळी सुनंदा पवणे यांच्याही गळ्यातील मीनी गंठण चोरी गेले बाबत व मी त्या महीलेला पाहीलेतर ओळखीन असे सांगीतलेने त्यांना गेटवर थांबवुन महीला व पुरुषांना बाहेर सोडत असताना सुनंदा पवणे यांनी गळ्यातील गंठण चोरणाऱ्या महीलेला ओळखल्यानंतर ती महीला गेट मधून न जाता पाठीमागे गेली व कार्यालयाच्या कंपाउन्ड वरुन जाण्याचा प्रयत्न करत असताना तीला जमलेल्या लोकांनी पकडले तीचे सोबत अजुन एक पुरुष हा देखील कार्यक्रमामध्ये चोरी करण्यासाठी तीला मदत करत असले बाबत दिसले. यावेळी त्यांनी चोरलेले गंठण त्यांचे सोबत असलेले इतर साथीदारांकडे देवुन ते साथीदार त्या ठीकाणाहुन फरार झाले. सदर प्रकरणी १) सुनिता जयाजी मीसाळ २) जयाजी सुपडाजी मीसाळ दोन्ही रा. दुधड ता. जि. संभाजीनगर सध्या रा.कासारी ता. शिरुर जि पुणे असे सांगीतले आहे.
पाच महिलांच्या ६ लाख ३० रुपयांच्या सोन्याची दागिन्यांची चोरी – कार्यक्रमामध्ये कुसुम काळूराम दरेकर यांचे सात तोळ्यांचे साडे तीन लाख रुपयांच्या किमाचे गंठण तर सुनंदा सखाराम पावणे यांचा १३ ग्रॅम वजनाचा मिनी गंठण ६५ हजार रुपये, रेणुका महेश कुऱ्हे यांचा १६ ग्रॅम वजनाचा मिनी गंठण ८० हजार रुपयांचा, मनीषा आकाश नारोडे यांचा २२ ग्रॅम वजनाचा मिनी गंठण १ लाख १० हजार रुपयांचा , चंद्रभागा भोगीलाला दरेकर यांचे ५ ग्रॅम सोन्याच्या मण्यांची पोठ चोरीस गेले असून एकूण ६ लाख ३० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले असून सदर प्रकरणी चोरांचा शिक्रापूर पोलिसांच्या वतीने शोध घेण्यात येत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुत्तमवार करत आहेत.