मयुरी रेसिडेन्सी मधील महिलांनी एकतासा ऐवजी केले अडीच तास श्रमदान
कोरेगाव भीमा. – केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसा “स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ” सणसवाडी ( ता.शिरूर) येथील मयुरी रेसिडेन्सी मधील महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत मयुरी रेसिडेन्सी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला ग्रामीण भागात उदंड प्रतिसाद मिळाला असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता पंधरवडा’ ‘स्वच्छता ही सेवा’ २०२३ अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख एक तास’ सकाळी दहा वाजता हा स्वच्छता उपक्रम सणसवाडी येथील मयुरी रेसिडेन्सी मधील महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारच्या व सणसवाडी ग्राम पंचायतीच्या कचरा साफ सफाई श्रमदान अभियानाच्या आवाहनाला सकारात्मक कृतियुकत प्रतिसाद देत सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत दोन तास परिसरात हातात झाडू व स्वच्छतेचे साहित्य घेत परिसर स्वच्छ केला व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली.यावेळी शासनाकडून एक तास श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आले याला चांगलाच प्रतिसाद देत महिला भगिनींनी अडीच तास श्रमदान केले.विषेशंजे अवघ्या चार वर्षांच्या बालिकेने श्रमदान करत सर्वांचे लक्ष वेधले.
या स्वच्छता अभियानातील लक्षणीय बाब म्हणजे सर्व महिलांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी महिलांनी आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासह महिलांच्या आरोग्याविषयी विविध उपक्रम राबवणार असून समाजातील गरजू कुटुंबांना मदत करणारा असल्याचे सांगितले.
यावली मयुरी रेसिडेन्सी चेअरमन वंदना पंडित दरेकर, व्हाईस चेअरमन मंगल संतोष शेळके , खजिनदार कोमल ढेकळे, सचिव छाया गादगी, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, संचालिका विभावरी पाटील ,पौर्णिमा सुभाष दरेकर, अंजली नागरे, अनुजा शिंदे, शिल्पा गाडे, सोमा दास मॅडम, कृष्णा शर्मा, सेलवा राणी, ज्योती भोसले, सुरेखा दरेकर, लताबाई हरगुडे, सिंधुबाई पुंड, मोनिका अमोल हरगुडे, शुभांगी नरके, सुनंदा हरगुडे रेश्मा चौरे सुभाष दरेकर, राहुल नांगरे, उदय पाटील, अशोक खवले, निलेश कदम, सलीम खान, संतोष शेळके, डॉक्टर पुंड रामभाऊ हरगुडे, अमोल हरगुडे, अशोक ढेकळे, किरण हरगुडे, उदय पाटील, नितीन विधाते, अरुण कुमार या सर्वांनी सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली.